राज्यघटनेचे संरक्षण करणे आव्हान - मुणगेकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 06:24 AM2018-06-27T06:24:49+5:302018-06-27T06:24:51+5:30

भाजपा सरकारमधील नेते भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात़ त्यामुळे राज्य घटनेचे संरक्षण करणे आव्हान आहे, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य खा़ डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले़

Challenge to Protect Constitution - Mungekar | राज्यघटनेचे संरक्षण करणे आव्हान - मुणगेकर

राज्यघटनेचे संरक्षण करणे आव्हान - मुणगेकर

googlenewsNext

पंढरपूर (जि. सोलापूर) : भारतीय राज्यघटना ही एक आदर्श असून, स्वातंत्र्यानंतर देशाची जी काही प्रगती झाली ती केवळ राज्यघटनेमुळेच़ मात्र, भाजपा सरकारमधील नेते भारतीय राज्यघटना बदलण्याची भाषा करतात़ त्यामुळे राज्य घटनेचे संरक्षण करणे आव्हान आहे, असे मत नियोजन आयोगाचे माजी सदस्य खा़ डॉ़ भालचंद्र मुणगेकर यांनी व्यक्त केले़
राजर्षी छ़ शाहू महाराज यांच्या १४४ व्या जयंतीनिमित्त पंढरपूर येथे आयोजित पहिल्या परिवर्तन साहित्य संमेलनाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते़ अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते़
मुणगेकर म्हणाले, की भारतीय राज्य घटनेमुळे समता, न्याय, बंधूता या मूल्यांची जोपासना झाली़ परिणामी देशाची प्रगती झाली़ पण या प्रगतीचे फायदे ज्या प्रमाणात व्हायला पाहिजे, त्या प्रमाणात श्रीमंतांच्या आणि राजकीय पक्षांच्या हस्तक्षेपामुळे झाले नाहीत. पण २०१४ च्या निवडणुकीत भाजपा सरकारने जनतेला जी आश्वासने दिली त्याची पूर्तता केली नाही़ उलट नोटाबंदीसारख्या कायद्यामुळे देशाची परिस्थिती चिंताजनक झाली आहे़
कोणतेही सरकार असो देशाची राज्यघटनेचे संरक्षण केले पाहिजे़ कारण तोच सर्वात महत्वाचा ग्रंथ आहे़ मात्र भाजपामधील नेते राज्य घटना बदलण्यासाठी आटापिटा करीत आहेत़ असे झाले तर गोरगरिबांना न्याय मिळणार नाही़, असे ते म्हणाले.

Web Title: Challenge to Protect Constitution - Mungekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.