‘कन्नड’च्या वेढ्यात मराठीची जपणूक - चाबुकस्वारवाडीतील प्रयत्न : ‘संस्काराचे मोती’स प्रतिसाद

By admin | Published: July 25, 2014 11:14 PM2014-07-25T23:14:59+5:302014-07-25T23:34:32+5:30

लोकमत इनिशिएटिव्ह

Chanchakwarwadi endeavors: 'Sanskara's pearl response' in 'Kannada' camp | ‘कन्नड’च्या वेढ्यात मराठीची जपणूक - चाबुकस्वारवाडीतील प्रयत्न : ‘संस्काराचे मोती’स प्रतिसाद

‘कन्नड’च्या वेढ्यात मराठीची जपणूक - चाबुकस्वारवाडीतील प्रयत्न : ‘संस्काराचे मोती’स प्रतिसाद

Next

दादा खोत - सलगरे ,,कर्नाटक राज्याच्या सीमेवरील पांडेगाव, शिरूर, खिळेगाव व अळट्टी या गावांनी आणि पर्यायाने ‘कन्नड’ भाषेने तीन्ही बाजूंनी वेढलेल्या महाराष्ट्रातील सीमावर्ती चाबुकस्वारवाडी (ता. मिरज) या ‘मराठी’ खाडीला जपण्याचे काम येथील जिल्हा परिषद शाळा करीत आहे. मराठी जपण्याच्या आणि वाढविण्याच्या शाळेच्या प्रयत्नात ‘लोकमत’चा ‘संस्काराचे मोती’ हा उपक्रम मैलाचा दगड ठरला आहे.
अवघ्या हजाराच्या घरात लोकवस्ती असलेल्या या गावात एकही हॉटेल, रुग्णालय, औषध दुकान, बॅँक, पतसंस्था, वीज-दूरसंचारसारखी कार्यालये नाहीत, कॉलेज नाही, गावाला सकाळी आणि सायंकाळी अशा दोनच बसफेऱ्या, इतकेच काय मुक्काम चाबुकस्वारवाडी आणि पोस्ट सलगरे अशा स्थितीत येथे कोण्या दैनिकाचा वृत्तपत्र वाटणारा आणि एजंटही नसताना येथील शिक्षक व पालकांच्या सकारात्मक, विचारांच्या प्रयत्नाने येथील विद्यार्थी ‘लोकमत’ संस्काराचे मोती योजनेच्या निमित्ताने तीन महिने का असेना, पण सहभागी होतात.
चाबुकस्वारवाडी हे गाव तीन्ही बाजूंनी कन्नड भाषेने वेढले आहे. अनेक विद्यार्थ्यांच्या घरी कन्नड भाषेतून संवाद सुरू असतो. अशा ‘मराठी’साठी प्रतिकूल परिस्थितीतही येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक मराठी रुजविण्यासाठी व वाढविण्यासाठी प्रयत्नशील असतात.
तीन वर्षांपूर्वी ‘लोकमत’च्या संस्काराचे मोती या स्पर्धेत ५० विद्यार्थी सहभागी झाले होते. ज्या विद्यार्थ्यांच्या वृत्तपत्राचे अर्धे पैसे शिक्षकांनी भरले होते, त्या समरजित नरुटे याला
बक्षीस योजनेच्या ड्रॉमध्ये तब्बल २१ हजारांचे बक्षीस मिळाले. बक्षिसाची रक्कम मिळाल्यानंतर त्याने शिक्षकांनी भरलेले १०० रुपये साभार परत केले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षीही चाळीस विद्यार्थ्यांच्या सहभागासह संस्काराच्या मोतीने वाचनात आणि हमखास बक्षीस मिळालेल्या रामबंधु लोणच्याने जेवणात रंगत आणली, अशी प्रतिक्रिया येथील विद्यार्थी देतात.
यंदा गावात पावसाअभावी दुष्काळाची स्थिती निर्माण झाली आहे. तरी येथील वीसभर विद्यार्थी यंदाही सहभागी असून शाळेच्या दर्शक फलकावर ‘लोकमत’चे संस्काराचे मोती हे पान वाचनास खुले करण्यात येत आहे. येथील पालक व शाळा व्यवस्थापन समितीच्या सजगतेमुळे येथे वृत्तपत्र वाचनासारख्या उपक्रमाबरोबरच अन्य उपक्रमातही सक्रिय सहभाग असतो. गतवर्षी येथे लोकवर्गणीतून ई-क्लाससाठी प्रोजेक्टर खरेदी केला आहे.
यावर्षी सातवीच्या विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव पालकांनी ई-क्लासला पसंती दर्शवित सर्वांनी वर्गणी काढून ई-क्लासचे सॉफ्टवेअर खरेदी करून ई - लर्निंग सुविधा निर्माण केली आहे. यामध्ये शिक्षक सूर्यकांत नलवडे, देवेंद्र गावंडे, मारुती हुलवान, आशा देवमाने, अशोक वाघावकर, दादासाहेब खोत, प्रवीण जगताप व मुख्याध्यापक सुखदेव वायदंडे यांचा महत्त्वाचा वाटा आहे.
येथील मराठी विषयशिक्षक प्रवीण जगताप यांनी मराठी विषयास पूरक असे लोकसाहित्य संग्रह, इंटरनेटवरून माहिती संग्रह, कात्रण संग्रह, परिपाठात आलटून पालटून म्हणी, वाक्प्रचार, कवितांचे, वर्तमानपत्रातील वाचनीय सदरांचे सादरीकरण, हस्ताक्षर सुधार प्रकल्प असे चार वर्षात वेगवेगळे उपक्रम राबविले आहेत. याचाच एक भाग म्हणून वाचनसंस्कारासाठी ‘लोकमत’च्या योजनेत विद्यार्थी सहभागी होत असतात.

पाण्याचा पुनर्वापर : बचतीबरोबर जलसंधारणावर भर हवा!
सांगली : जिल्ह्याला वरदान ठरलेल्या चांदोली (वारणा) धरणाने जून महिन्यात प्रथमच तळ गाठला होता. शेतीच्या पाणी वापरावर बंदी घालण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली होती. पावसाच्या पाण्याचा योग्य वापर आणि ते साठवले नाही, तर भविष्यात यावर्षीपेक्षाही भीषण पाणीटंचाईचे संकट निर्माण होण्याची शक्यता आहे. म्हणूनच धरणांतील पाणीसाठा जपून वापरण्याची आवश्यकता आहे. सढळ हाताने पाणी वापरण्याची सवय सोडण्याची गरज आहे. जिल्ह्यातील काही गावांनी पाण्याच्या बचतीचा वेगळा आदर्श निर्माण केला आहे. यातूनच प्रेरणा घेण्याची गरज आहे. काही गावे दुष्काळातही ‘पाणीदार’ होती. या गावांनी केलेल्या जलसंधारणातील कामांचा आदर्श आपणही घेण्याची वेळ आली आहे.
थेंब महत्त्वाचा
उज्ज्वल भविष्यासाठी
जिल्ह्यात चांदोली (वारणा) हे एकमेव धरण आहे. कोयना धरण सातारा जिल्ह्यात असले तरी, कृष्णा नदीच्या माध्यमातून सांगली जिल्ह्याच्या ५० टक्के भागाला त्याचा फायदा होतो. मान्सून पावसाने ओढ दिल्यामुळे चांदोली आणि कोयना या दोन्ही धरणांनी तळ गाठला होता. कोयना धरण प्रथमच कोरडे पडण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे सांगली, मिरज, कुपवाड शहरांसह जिल्ह्यातील अनेक गावांवर पाणी कपातीचे संकट येण्याची शक्यता होती. पाणीटंचाईचे प्रश्न निर्माण झाले की, प्रशासन, राज्यकर्ते आणि आपणही निसर्गाच्या लहरीपणाकडे बोट दाखवून हात वर करण्यात धन्यता मानतो. मात्र, संभाव्य परिस्थितीला तोंड देण्यासाठी माझ्या गावाने काही तरी केले पाहिजे, याची प्रत्येकाला जाणीव झाली पाहिजे. जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील गार्डी, सांगोले, रेणावी, बेणापूर, कडेगाव तालुक्यातील शाळगाव, वांगी या गावांनी जलसंधारणाचे आदर्श प्रकल्प राबविले आहेत. त्यामुळे दुष्काळातही या गावांना पाणीटंचाई जाणवली नाही. या ‘पाणीदार’ गावांनी पाणीटंचाईवर कशी मात केली, याची माहिती समाजासमोर येणे गरजेचे आहे. पाणी बचतीबाबत अनेकवेळा चर्चा होते, विविध उपाय सुचविले जातात. मात्र, पाऊस सुरु झाला की सगळे मनसुबे वाहून जातात. आता मात्र आपण धडा घेण्याची वेळ आली आहे.
सामूहिक जबाबदारी
-सार्वजनिक ठिकाणी असलेल्या नळकोंडाळ्यांची तातडीने दुरुस्ती करा
-येत्या पावसाळ्यात मोठमोठ्या चरी घेऊन पाणी अडविण्यासाठी पुढाकार घ्या
-जुने जलस्रोत व कूपनलिकांचे पुनरुज्जीवन आवश्यक आहे
-नैसर्गिक जलस्रोत व टेकांवरील अतिक्रमण रोखा. वृक्षारोपण करून आपली ओळख जपा
वैयक्तिक जबाबदारी
-ग्रामस्थांनी कपडे व भांडी धुताना पाण्याचा कमीत कमी वापर करावा
-अंघोळ व दाढी करताना आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे
-नळाच्या पाण्याने गाडी धुण्यापेक्षा बादलीत पाणी घेऊन ओल्या फडक्याने गाडी पुसावी
-शेतकऱ्यांनी शेतीला पाणी देताना अतिरिक्त पाणी देऊ नये, आवश्यक तेवढेच पाणी वापरावे

पावसाच्या पाण्याचा एक थेंबही वाहून जाणार नाही, याची दक्षता घेण्याची गरज आहे. उपलब्ध पाण्यावर पीक पध्दती करण्याची शासनानेच सक्ती केली पाहिजे. शिवाय, आपत्कालीन परिस्थितीत पाणी बचत, पाण्याचा पुनर्वापर, रेनवॉटर हार्वेस्टिंग व जुन्या जलस्रोताचे पुनरुज्जीवन करण्यासाठी सामाजिक संस्था आणि ग्रामस्थांनी पुढाकार घेतला पाहिजे.
- संपतराव पवार, पाणी विषयाचे अभ्यासक.

अंघोळ
४बादलीत पाणी घेऊन केल्यास : १८ लिटर ४शॉवरखाली : १०० लिटर
दाढी
४नळ सोडून दाढी केल्यास : १० लिटर
४मग घेऊन : १ लिटर
ब्रश
-नळ सोडून केल्यास : १० लिटर
-मग घेऊन : १ लिटर
कपडे
-नळाखाली : ११६ लिटर
-बादलीचा वापर : ३६ लिटर
मोटार
-पाईप वापरल्यास : १०० लिटर
-बादलीचा वापर : १८ लिटर
हात धुण्यासाठी
-नळाखाली : १० लिटर
-मग घेऊन : अर्धा लिटर
शौचविधी
-फ्लश केल्यास : २० लिटर
-बादलीचा वापर : ६ लिटर
ग्रामस्थांनो, लक्षात ठेवा
खरं तर आपण पाण्याची काटकसर करत नाही. अमर्याद वाढणारी लोकसंख्या आणि पाण्याच्या अमर्याद वापराची सवय यामुळे पाण्याची टंचाई सर्वांनाच जाणवू लागली आहे. त्यात पावसाने ओढ दिल्याने आता पाणी बचत करण्याची सक्ती करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आपल्या सवयी बदलाव्या लागणार आहेत. या सवयी बदलण्यासाठी छोटे-छोटे उपाय आपण करू शकतो.

Web Title: Chanchakwarwadi endeavors: 'Sanskara's pearl response' in 'Kannada' camp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.