चंदनचोर महिला टोळीला सोलापुरात अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 01:08 PM2019-04-16T13:08:07+5:302019-04-16T13:11:55+5:30
वनविभागाने ताब्यात घेतलेल्या महिलांची तपासणी केली असता त्यांच्याकडे एक करवत, पाच कुºहाड, एक कुदळ व चंदन झाड तपासणीसाठी वापरण्यात येणारी ड्रील मशीन आढळून आले.
सोलापूर : गेल्या अनेक दिवसांपासून चंदनाची झाडे कापून चोरी करणाºया पाच चंदनचोर महिलांच्या टोळीला वनमजुरांनी सोमवारी पाठलाग करून पकडले. यावेळी झालेल्या दगडफेकीमध्ये दोन मजूर किरकोळ जखमी झाले. सिद्धेश्वर वनविहारामध्ये दुपारी दीडच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.
सिद्धेश्वर वनविहारामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वन विभागाच्या कर्मचाºयांची नजर चुकवून चंदनाची मोठमोठी झाडे कापून चोरी केली जायची. प्रत्यक्ष चोर मात्र सापडत नव्हते. या टोळीला जेरबंद करण्यासाठी रात्रीची गस्तही वाढविण्यात आली होती. सोमवारी दुपारी दीडच्या सुमारास रामभाऊ निरवणे गस्त घालत असताना त्यांना झाडीमध्ये काही महिला संशयास्पदरित्या फिरताना दिसल्या.
तत्काळ त्यांनी फोनवरून वन अधिकाºयांना कळविले. लागलीच घटनास्थळी वन परिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव, वनरक्षक शुभांगी कोरे, वनिता इंगोले, अनिता शिंदे व वन मजुरांचे पथक पोहोचले. वन विभागाची चाहूल लागताच महिला आरोपींनी त्यांच्या दिशेने दगड फेकले व पळून जाण्याचा प्रयत्न केला. या धावपळीत वन मजूर मारुती खिलारे व चंद्रशेखर खजुरे, प्रसन्नजीत भोसले किरकोळ जखमी झाले. पाठलाग करून सर्व महिला आरोपींना पकडण्यात आले.
या महिलांना पाठलाग करून जेरबंद करण्यात प्रसन्नजीत भोसले, जालिंदर माळी, मारुती खिल्लारे, दत्ता जाधव, चंद्रशेखर खजुरे, रामा निरवणे, राजू गायकवाड, मुन्ना निरवणे, सुधाकर चौधरी, दिगंबर गाढवे यांनी मोलाची भूमिका निभावली.
वनपरिक्षेत्र अधिकारी निकेतन जाधव यांनी अधिक चौकशी केली असता ताब्यात घेण्यात आलेल्या महिला गेल्या अनेक वर्षांपासून चंदनचोरी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. अधिक तपास सुरू असून, यानंतर त्यांना न्यायालयापुढे उभे करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
कुºहाडीसह चटणीचा डबा आढळला
- त्याची तपासणी केली असता त्यांच्याजवळ एक करवत, पाच कुºहाड, एक कुदळ व चंदन झाड तपासणीसाठी वापरण्यात येणारी ड्रील मशीन आढळून आली. तोडलेल्या चंदन झाडांचे २० ते २५ किलो ओंडके व कोणी पकडण्यासाठी आले तर प्रतिकार करण्यासाठी डोळ्यात फेकण्यासाठी लाल चटणीचा डबाही आढळून आला. सर्व ंमहिला आरोपी संपूर्ण तयारीने चंदन चोरीसाठी आलेल्या होत्या. अधिक चौकशी केली असता या पाच जणींपैकी कुरुलची एक, कामतीच्या दोघी आणि एक वाळूज देगाव येथील असल्याचे आढळले.