विठ्ठल-रुक्मिणी मातेची चंदनउटी पूजा बंद; ऋतूचक्र बदलल्याने घेतला निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2020 12:32 PM2020-06-09T12:32:53+5:302020-06-09T12:36:47+5:30
पंढरपूर मंदिर समितीची माहिती; पंढरपुरातील विठ्ठलाचे मंदिर ३० जूनपर्यंत बंद राहणार
पंढरपूर : उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये उष्णता वाढते, यामुळे शरीराचा दाह होऊ नये, शरीराला थंडावा मिळावा, यासाठी पाडव्याच्या दिवसापासून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेला चंदनउटी पूजा सुरू करण्यात आली होती. मात्र आता ऋतूचक्र बदलल्याने वातावरणात थंडावा निर्माण होत असल्यामुळे चंदनउटी पूजा बंद करण्यात येणार आहे. पूजेची सांगता मंगळवारी होत आहे.
गर्दी होऊन कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर बंद करण्यात आले आहे. मात्र, श्री विठ्ठलाचे नित्योपचार सुरूच होते.
शिवाय विविध उत्सवांनिमित्त देखील मंदिरात सजावट करण्यात आली होती. उन्हाळ्याची सुरुवात होताच श्री विठ्ठलाला दाखवण्यात येणाºया नैवेद्यामध्ये बासुंदी हा पदार्थ बंद करून श्रीखंड हा थंड पदार्थ देण्यात आला होता. चंदनउटी पूजा चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून सुरू करण्यात आली होती.
मृग नक्षत्र सुरू झाले आहे. यामुळे चंदनउटी पूजा बंद करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी चंदनउटी पूजेचा सांगता समारंभ होणार आहे. यानिमित्त परिवार देवतातील देवीदेवतांची चंदनउटी पूजा केली जाणार असल्याचे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
पन्नासहून अधिक कर्मचाºयांनीच केली चंदनउटी पूजा
- १७ मार्चपासून भाविकांसाठी मंदिरात प्रवेश बंद करण्यात आला होता. श्री विठ्ठलाच्या चंदनउटी पूजेसाठी १७ हजार रुपये तर श्री रुक्मिणी मातेच्या पूजेसाठी ८ हजार ५०० रुपये भाविकांकडून घेतले जातात. चंदनउटी पूजेसाठी भाविकांनी मंदिर समितीकडे नोंदणी केली होती. परंतु इच्छुक भाविकांना लॉकडाऊनमुळे चंदनउटी पूजा करण्यासाठी मंदिरात येता आले नाही. यामुळे मंदिर समितीमध्ये काम करणाºया ५० हून अधिक कर्मचाºयांच्याच हस्ते विनामूल्य चंदनउटी पूजा करण्यात आली. त्यामध्ये निवृत्त होणाºया कर्मचाºयांचा समावेश होता. शेवटची चंदनउटी पूजाही कर्मचाºयांच्या हस्ते होणार असल्याचे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.