चंद्रभागा वाळवंटातील दशक्रियाविधी केले बंद; पुजाºयांनाही दिल्या नोटीसा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 21, 2020 11:19 AM2020-03-21T11:19:14+5:302020-03-21T11:27:27+5:30
पंढरपूर; विठ्ठल-रूक्मिणी मंदिरानंतर पुंडलिक मंदिरही केले बंद
पंढरपूर : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर चंद्रभागा वाळवंटात होणाºया सर्व विधीला बंदी घालण्यात आल्याची माहिती पंढरपूरचे प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले.
पंढरपूर येथे राज्यभरातून भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. त्याच पद्धतीने चंद्रभागा नदीच्या वाळवंटात दशक्रिया विधीसाठी येतात. शनिवारी चंद्रभागा वाळवंटामध्ये दशक्रिया विधी सुरू असल्याची माहिती प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी सांगितले. तत्काळ ते मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर व पोलीस निरीक्षक अरुण पवार यांच्यासह चंद्रभागा वाळवंटात पोहचले. त्या ठिकाणी होणारा दशक्रिया विधी थांबवण्यात आला. तसेच दशक्रिया विधी करणाºया पुजाºयाला नोटीसही देण्यात आले. यावेळी चंद्रभागा वाळवंटातील पुंडलिक मंदिर बंद करण्याबाबत मंदिराच्या विश्वस्तांना सूचना प्रांताधिकारी सचिन ढोले यांनी दिल्या.