चंद्रभागा नदीपात्रात गाढवांच्या मदतीने वाळूचोरी, जिल्हाधिकाºयांनाच दिसला प्रकार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2017 12:48 PM2017-12-21T12:48:18+5:302017-12-21T12:49:32+5:30
वाळूचोरी थांबवण्यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन गस्त घालण्यासाठी पथक नेमावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले देत असतानाच स्मशानभूमीजवळील नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने दिवसा वाळूचोरी सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
पंढरपूर दि २१ : चंद्रभागा नदीपात्रातून होणाºया वाळू उपशामुळे चंद्रभागेत खड्ड्यांचे साम्राज निर्माण होऊन अनेक भाविकांना जीव गमवावा लागत आहे. यामुळे वाळूचोरी थांबवण्यासाठी नागरिकांना बरोबर घेऊन गस्त घालण्यासाठी पथक नेमावे, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले देत असतानाच स्मशानभूमीजवळील नदीपात्रातून गाढवांच्या सहाय्याने दिवसा वाळूचोरी सुरु असल्याचे चित्र पाहावयास मिळाले.
पंढरपूर शहरात सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले आले होते. यादरम्यान त्यांनी चंद्रभागा नदीची पाहणी केली. यावेळी त्यांना वाल्मिकी संघाचे अध्यक्ष गणेश अंकुशराव यांनी चंद्रभागा वाळवंटात चोरुन वाळू उपसा होत असल्याची माहिती दिली.
चंद्रभागा वाळवंटात दिवस-रात्र गाढवांच्या सहाय्याने वाळूचोरी होते. यामुळे चंद्रभागा नदीपात्रात जागोजागी खड्डे पडत आहेत. या खड्ड्यांबाबत चंद्रभागेत पवित्र स्नान करण्यासाठी येणाºया भाविकांना जाणीव नसते. यामुळे ते चंद्रभागा पात्रात गेल्यानंतर अचानक त्यांना खड्डे लागतात. त्यामुळे ज्यांना पोहणे जमत नाही, अशा भाविकांना व नागरिकांना आपला जीव गमवावा लागतो. नदीपात्रातून होणारी वाळूचोरी थांबवावी, अशी मागणी होत आहे. त्यावर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी वाळूचोरी होऊ नये, यासाठी गस्त घालण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांची मदत घ्या, अशी सूचना तहसूलदार मधुसूदन बर्गे, प्रांताधिकारी डॉ. विजय देशमुख, सहायक पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना केली. सूचना सुरू असतानाच दुपारी एकच्या सुमारास स्मशानभूमी घाटाजवळील नदीपात्रातून गाढवाच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु होता; मात्र त्याठिकाणी महसूल कर्मचारी बघ्याची भूमिका घेत उभे होते. वाळू उपसा सुरु असल्याची माहिती सहा. पो. अधीक्षक निखिल पिंगळे यांना समजताच ते तत्काळ त्याठिकाणी पोहचले; मात्र तोपर्यंत त्याठिकाणावरुन वाळू चोरांनी पोबारा केला होता.
---------------------------
वाळू चोरीसाठी बंधाºयातून सोडतात पाणी
चंद्रभागा नदीपात्रात भाविकांना पवित्र स्नान करण्यासाठी पाणी रहावे, यासाठी चंद्रभागा नदीवर विष्णूपदाजवळ कोल्हापूर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला आहे. त्यामुळे चंद्रभागा नदीपात्रात पाणी राहते, परंतु त्यामुळे वाळू चोरी करताना वाळू चोरांना अनेक अडचणी निर्माण होतात. यामुळे विष्णूपद जवळील बंधाºयाची दरवाजे वाळू चोर काढून टाकतात. यामुळे चंद्रभागा नदीपात्रातील पाणी कमी होते. तसेच पुंडलिक मंदिराजवळ पाण्याचे डबके साठते, त्याच डबक्यात भाविक पवित्र स्नान करतात.
----------------------
महसूल कर्मचाºयांची बघ्याची भूमिका
- स्मशानभूमी घाटाजवळील नदीपात्रातून गाढवाच्या सहाय्याने वाळू उपसा सुरु होता; मात्र त्याठिकाणी उपस्थित असलेल्या महसूलच्या कर्मचाºयांनी संबंधित वाळू चोरावर कारवाई केली नाही. फक्त बघ्याची भूमिका घेत उभे होते.