चंद्रकांत पाटलांनी स्वत:च्या हातातील घड्याळ दिलं दुसऱ्याला; जाणून घ्या नेमकं कारण
By Appasaheb.patil | Published: January 28, 2024 05:07 PM2024-01-28T17:07:18+5:302024-01-28T17:08:02+5:30
सोलापूर : शंभराव्या व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नॉर्थकोट मैदान, सोलापूर येथे आज रविवार २८ ...
सोलापूर : शंभराव्या व्या अखिल भारतीय विभागीय मराठी नाट्य संमेलनाचा हस्तांतरण सोहळा नॉर्थकोट मैदान, सोलापूर येथे आज रविवार २८ जानेवारी २०२४ रोजी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाला. याचवेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत:च्या हातातील घड्याळ काढले अन् भेट म्हणून संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंके यांना दिलं. या अचानक झालेल्या आनंदीमय सोहळ्यानं संमेलनाच्या शामियानातील प्रक्षेक अन् व्यासपीठावरील पाहुणे, मान्यवर आश्चर्चचकीत झाले.
दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वत:च्या हातातील घड्याळ भेट देण्याविषयी सांगितले की, कोणत्याही मोठया कार्यक्रमात जो व्यक्ती मनापासून, सर्वांना सोबत घेऊन काम करून तो कार्यक्रम यशस्वी करतो त्या व्यक्तीचे मी कौतुक तर करेनच पण त्या कौतुकावर न थांबता त्यास मी माझ्या स्वत:च्या हातातील घड्याळ भेट देतो, असे सांगत हातातील घड्याळ काढून संमेलनाचे प्रमुख कार्यवाह विजयकुमार साळुंखे यांच्या हातात बांधले. या अचानक घडलेल्या आनंदमयी सोहळ्यानं विजयकुमार साळुंखेंना अश्रु अनावर झाले. संमेलनाच्या व्यासपीठ अन् शामियानातील उपस्थितांनी टाळ्याच्या कडकडाटात साळुखेंच्या कामाचं कौतुक केले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटलांनी बीडमध्ये होणाऱ्या संमेलनाला शुभेच्छा दिल्या.
यावेळी अखिल भारतीय नाट्य संमेलनाचे अध्यक्ष जब्बार पटेल, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे कोषाध्यक्ष सतीश कोरके, सिने कलाकार किशोर महाबोले, नीलम शिर्के -सामंत, दीपक करंजीकर,अशोक हांडे, अतुल परचुरे, सोलापूर विद्यापीठाचे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रा. शिवाजी सावंत, कार्याध्यक्ष प्रकाश यलगुलवार, कार्याध्यक्ष अविनाश महागावकर, समन्वयक मोहन डांगरे, स्वागत सचिव प्रशांत बडवे यांच्यासह सोलापूर जिल्ह्यातील नाट्य परिषदेच्या शाखेचे अध्यक्ष उपस्थित होते.