महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल; खंडित वीज पुरवठ्यासाठी मिसकॉल सेवा

By Appasaheb.patil | Updated: September 5, 2022 19:19 IST2022-09-05T19:11:58+5:302022-09-05T19:19:25+5:30

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल; खंडित वीज पुरवठ्यासाठी मिसकॉल सेवा

Change in toll free numbers of Mahavitran; Miscall service for interrupted power supply | महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल; खंडित वीज पुरवठ्यासाठी मिसकॉल सेवा

महावितरणच्या टोल फ्री क्रमांकात बदल; खंडित वीज पुरवठ्यासाठी मिसकॉल सेवा

सोलापूर राज्यातील सुमारे दोन कोटी ऐंशी लाख ग्राहकांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेल्या महावितरणचा एक टोल फ्री क्रमांक बदलण्यात आला असून नवीन नंबर १८००-२१२-३४३५ असा असणार आहे तर पूर्वीपासून सुरु असलेल्या १८००-२३३-३४३५ , १९१२ व १९१२० या क्रमांकात कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत.

या क्रमांकावर ग्राहक विद्युत पुरवठा खंडित वा आपत्कालीन परिस्थितीच्या तांत्रिक बिघाडाकरिता, तसेच चालू वीज दर, वीज दरातील बदल, वीज देयक विषयक तक्रारी, नवीन वीजजोडणी सारख्या वाणिज्य विषयक तक्रारींकरिता तसेच वीज चोरी, नावातील बदल, नादुरुस्त वीज मीटर  बदलणे आदी तक्रारी या उपलब्ध क्रमांकावर नोंदवू शकतात.

 याचबरोबर महावितरण तर्फे खंडित वीज पुरवठ्याच्या तक्रारीसाठी मिसकॉल सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे व या क्रमांकात बदल करण्यात आला आहे.  ग्राहक नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ०२२- ५०८९७१०० या क्रमांकावर मिसकॉल देऊन आपली तक्रार नोंदवू शकतात. ज्या ग्राहकांनी अद्याप आपले मोबाईल क्रमांक महावितरणकडे नोंदवले नाहीत ते ग्राहक, महावितरण मोबाईल ॲपद्वारे किंवा वरील टोल-फ्री क्रमांकावर फोन करून आपला ग्राहक क्रमांक सांगून आपल्या मोबाईल क्रमांकाची नोंद करू शकतात.

Web Title: Change in toll free numbers of Mahavitran; Miscall service for interrupted power supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.