देवळाली, सावडी, कुंभेज, उमरड, साडे येथे सत्तापरिवर्तन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:21 AM2021-02-13T04:21:48+5:302021-02-13T04:21:48+5:30
सरपंच, उपसरपंच निवडीत फोडाफोडीच्या भीतीने सर्वच गटाच्या नेतेमंडळीनी ग्रामपंचायत सदस्याची विशेष काळजी घेत सहलीला पाठवून दिले. त्यांना थेट निवडीप्रसंगीच ...
सरपंच, उपसरपंच निवडीत फोडाफोडीच्या भीतीने सर्वच गटाच्या नेतेमंडळीनी ग्रामपंचायत सदस्याची विशेष काळजी घेत सहलीला पाठवून दिले. त्यांना थेट निवडीप्रसंगीच आणले.
देवळाली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी आशिष गायकवाड यांची, तर उपसरपंचपदी अश्विनी धनंजय शिंदे हे १३ पैकी ७ मते घेऊन विजयी झाले. पाटील गटाकडून सरपंचपदासाठी द्रौपदी कानगुडे व उपसरपंच पदासाठी कल्याण शेळके यांना प्रत्येकी सहा मते मिळाली. उमरड येथे आदिनाथचे माजी अध्यक्ष वामनराव बदे यांनी ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करत राजश्री चोरमले यांना सरपंचपदाची संधी दिली. उपसरपंचपदी अन्नपूर्णा बदे यांची निवड झाली. ही निवड बिनविरोध झाली. कुंभेज ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाचे वर्चस्व असून, सरपंचपदी सिंधू गायकवाड व उपसरपंचपदी संजय तोरमल यांची बिनविरोध निवड झाली. साडे ग्रामपंचायतीवर आमदार संजय शिंदे व माजी आमदार जयंतराव जगताप यांच्या गटाच्या अनिता पाटील यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी मंगल पाटील यांची निवड झाली आहे.
झरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी पाटील गटाचे मच्छिंद्र घाडगे यांची, तर उपसरपंचपदी सुनीता कांबळे यांची निवड झाली आहे. पांडे ग्रामपंचायतीवर माजी आमदार नारायण पाटील गटाच्या अनिता मोटे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी शिवाजी भोसले यांची निवड झाली. श्रीदेवीच्या माळ ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी जगताप गटाचे महेश सोरटे यांची सरपंचपदी, तर उपसरपंचपदी विद्याराणी थोरबोले यांची निवड झाली आहे.
२० ग्रामपंचायतींवर आमच्या गटाचा सरपंच : शिंदे गटाचा दावा
उमरड, सावडी, जातेगाव, बोरगाव, वडगाव, हिसरे, नेरले, केडगाव, पांगरे, करंजे, साडे, झरे, सौंदे, पाडळी, सालसे, जेऊरवाडी, सरपडोह, शेलगाव क, भोसे, सांगवी या ग्रामपंचायतीवरती आमदार शिंदे यांची सत्ता आलेली आहे. काही ग्रामपंचायतीमध्ये स्वतंत्रपणे तर काही ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक पातळीवर युती करून हे यश आमदार संजयमामा शिंदे गटाला मिळालेले असल्याचा दावा शिंदे गटाने केला आहे.
ग्रामपंचायतनिहाय सरपंच, उपसरपंच
फिसरे : सरपंच प्रदीप अंकुशदौंडे, उपसरपंच लता लटके, घारगाव : सरपंच लोचना पाटील, उपसरपंच सतीश पवार, पाथुर्डी : सरपंच अश्विनी मोटे, उपसरपंच प्रकाश खरात, वडगाव : सरपंच जनाबाई अंधारे, उपसरपंच अंकुश शिंदे, मिरगव्हाण : सरपंच शालन हाके, उपसरपंच रामदास ओहोळ, दिलमेश्वर/वाघाचीवाडी : सरपंच विजया मोरे, उपसरपंच अविनाश राक्षे, सरपडोह : सरपंच मालन वाळके, उपसरपंच नारायण रंदवे, साडे : सरपंच अनिता पाटील, उपसरपंच मंगल पाटील, श्रीदेवीचामाळ : सरपंच महेश सोरटे, उपसरपंच विद्याराणी थोरबोले, नेरले : सरपंच प्रतिभा दौड, उपसरपंच कांचन काळे, शेटफळ : सरपंच विकास गुंड, उपसरपंच अन्नपूर्णा नाईकनवरे, हिवरवाडी : सरपंच अनिता पवार, उपसरपंच संभाजी गुळवे, देवळाली/खडकेवाडी : सरपंच आशिष गायकवाड, उपसरपंच अश्विनी शिंदे, आळसुंदे : सरपंच मंगल देवकते, उपसरपंच नागनाथ सरवदे, केडगाव : सरपंच वर्षा पवार, उपसरपंच अमोल बोराडे, पाडळी : सरपंच शीलावती पिंपरे, उपसरपंच पांडुरंग ढाणे, पोथरे/नीलज : सरपंच धनंजय झिंजाडे, उपसरपंच अंकुश शिंदे, हिवरे : सरपंच सुनीता माळी, उपसरपंच मैना फरतडे, हिसरे : सरपंच सोमनाथ ठोंबरे, उपसरपंच गणेश जगदाळे, पांडे : सरपंच अनिता मोटे, उपसरपंच शिवाजी भोसले, पोटेगाव : सरपंच अमृता नाईकनवरे, उपसरपंच बारीकराव जगदाळे, बोरगाव : सरपंच शारदा गायकवाड, उपसरपंच दत्तात्रय खराडे, करंजे/भालेवाडी : सरपंच सुनीता जाधव, उपसरपंच सोनाली सरडे, पिंपळवाडी : सरपंच मदन पाटील, उपसरपंच वैशाली चव्हाण, आळजापूर : सरपंच मनीषा घोडके, उपसरपंच नितीन गपाट, अर्जुननगर : सरपंच अश्विनी थोरात, उपसरपंच अभिमन्यू धुमाळ, निमगाव ह : सरपंच लखन जगताप, उपसरपंच श्रीकांत नीळ, जेऊरवाडी : सरपंच माया निमगिरे, उपसरपंच रिक्त, ढोकरी : सरपंच भामाबाई खरात, उपसरपंच राणी खरात, सावडी : सरपंच शशिकला शेळके, उपसरपंच महेंद्र एकाड, मलवडी : सरपंच मनीषा कोंडलकर, उपसरपंच पप्पू कोळी, कविटगाव : सरपंच विद्या सरडे, उपसरपंच भाऊसाहेब जगदाळे, सालसे : सरपंच सतीश ओहोळ, उपसरपंच सुदामती घाडगे, कोंढेज : सरपंच छाया राऊत, उपसरपंच शहाजी राऊत, मांगी : सरपंच निर्मला बागल, उपसरपंच नवनाथ बागल, पुनवर : सरपंच शैला शेळके, उपसरपंच रोहिदास जाधव, बिटरगाव : सरपंच अभिजित मुरूमकर, उपसरपंच : पूजा जाधव, सांगवी : सरपंच शोभा बनसुडे, उपसरपंच वैभव तळे, कुंभेज : सरपंच सिंधू गायकवाड, उपसरपंच संजय तोरमल, शेलगाव क : सरपंच अशोक काटुळे, उपसरपंच कविता वीर, गुळसडी: सरपंच संजीवनी यादव, उपसरपंच योगेश भंडारे, सौंदे : सरपंच लता गायकवाड, उपसरपंच उमेश वीर, बाळेवाडी : सरपंच नितीन लोंढे, उपसरपंच निर्मला नलवडे, भोसे : सरपंच दीपक सुरवसे, उपसरपंच अमृता सुरवसे, कुगाव : सरपंच कौशल्या कामटे, उपसरपंच मन्सूर सय्यद, पांगरे : सरपंच विजया सोनवणे, उपसरपंच सचिन पिसाळ, जातेगाव : सरपंच छगन ससाणे, उपसरपंच अच्युतराव कामटे, कोळगाव : सरपंच तात्यासाहेब शिंदे, उपसरपंच सिंधू प्रभाकर चेंडगे, रोशेवाडी : सरपंच नंदाबाई धायतोंडे, उपसरपंच किशोर कांबळे, उमरड : सरपंच राजश्री चोरमले, उपसरपंच अन्नपूर्णा संदीप बदे, झरे : सरपंच मच्छिंद्र घाडगे, उपसरपंच सुनीता कांबळे.