गारअकोले, नगोर्ली, टाकळीत सत्ता परिवर्तन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:25 AM2021-01-19T04:25:11+5:302021-01-19T04:25:11+5:30

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील कोंढार भागातील गारअकोले, नगोर्ली, टाकळी (टे) या गावांमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. या परिवर्तनात ...

Change of power in Garakole, Nagorli, Takli | गारअकोले, नगोर्ली, टाकळीत सत्ता परिवर्तन

गारअकोले, नगोर्ली, टाकळीत सत्ता परिवर्तन

googlenewsNext

टेंभुर्णी : माढा तालुक्यातील कोंढार भागातील गारअकोले, नगोर्ली, टाकळी (टे) या गावांमध्ये सत्ता परिवर्तन झाले आहे. या परिवर्तनात युवापिढीने महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

गारअकोले निवडणुकीत स्वामी महाराज संप्रदाय आघाडीने ७ पैकी ४ जागा जिंकून सत्ता हस्तगत केली तर विरोधी स्वामी महाराज ग्रामविकास आघाडीने ३ जागांवर विजय मिळवला आहे. स्वामी महाराज संप्रदाय आघाडीचे उमेदवार गोविंद पवार, वर्षा केचे, बळीराम केचे व सुलभा अशोक बिचुकले हे विजयी झाले. तर विरोधी स्वामी महाराज ग्रामविकास आघाडीचे उमेदवार नंदा बिचुकले, वैष्णवी देवकते व अमृता पवार हे विजयी झाले आहेत.

नगोर्ली येथेही सत्ता परिवर्तन झाले आहे. भैरवनाथ ग्रामीण विकास आघाडीने ९ पैकी ८ जागा जिंकून विरोधी श्रीराम ग्रामविकास आघाडीचा दारुण पराभव केला. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे उमेदवार सुवर्ण सुनील भानवसे, विक्रम महाडिक, सारिका लोंढे, राणी ढवळे, मैना वाघमारे, जयश्री खोले, सोनाली भोसले व कोमल गुटाळ हे विजयी झाले असून, विरोधी श्रीराम ग्रामीण विकास आघाडीच्या जयश्री मोरे या एकमेव उमेदवार विजयी झाल्या. नगोर्ली येथे ९ पैकी ८ महिलांना ग्रामपंचायत सदस्य होण्याचा मान मिळाला.

शेवरे येथेही सत्ता परिवर्तन झाले. शेवरे ग्रामीण विकास आघाडीने नऊपैकी ५ जागा जिंकून सत्ता हस्तगत केली. आमदार बबनराव शिंदे यांचे समर्थक ब्रह्मदेव मस्के गटाचा पराभव झाला. शेवरे ग्रामविकास आघाडीचे उमेदवार प्रवीण मोरे, स्वाती मस्के, अनिता खताळ, लक्ष्मण मस्के व हेमलता मस्के हे विजयी झाले. विरोधी दादा-मामा ग्रामविकास आघाडीचे उमेदवार भारत काळे, रमेश मस्के व काजल देखने व वृषाली कांबळे हे विजयी झाले.

---

टाकळीत ५० वर्षांनंतर सत्तांतर

टाकळी येथे ५० वर्षांनंतर सत्ता परिवर्तन झाले. विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक हिम्मत सोलनकर यांच्या दादा-मामा विकास आघाडीचा धक्कादायक पराभव झाला. तानाजी सलगर यांच्या भैरवनाथ ग्रामविकास आघाडीने सर्वच्या सर्व ९ जिंकून सत्ता हस्तगत केली. भैरवनाथ ग्रामविकास आघाडीचे उमेदवार रूपाली आयवळे, सिंधूबाई भोसले, अजित घाडगे, वैशाली कळसाईत, माधुरी माने, तानाजी सलगर, सत्यवान जरग व सोनाली घाडगे हे विजयी झाले.

Web Title: Change of power in Garakole, Nagorli, Takli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.