श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

By Appasaheb.patil | Published: September 30, 2022 07:12 PM2022-09-30T19:12:05+5:302022-09-30T19:12:12+5:30

७ ते १० ऑक्टोबरपर्यंत राहणार बदल; पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांचे आदेश

Changes in traffic routes on the occasion of Shri Tuljabhavani Sharadiya Navratri Festival; Learn about alternative ways | श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

श्री तुळजाभवानी शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक मार्गात बदल; जाणून घ्या पर्यायी मार्ग

googlenewsNext

सोलापूर : कोजागिरी आणि मंदिर पौर्णिमा यानिमित्त तुळजापूरकडे पायी चालत जाणाऱ्या भाविकांची गर्दी होऊन कोंडी होण्याची शक्यता आहे. यामुळे ७ ऑक्टोबर २०२२ रोजी कोजागिरी पौर्णिमा व १० ऑक्टोबर २०२२ रोजी मंदिर पोर्णिमा यादरम्यान वाहन चालकांसाठी वाहतूक मार्गात बदल करण्यात आल्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत.

सोलापूर शहर, जिल्ह्यातील, कर्नाटक राज्यातील भाविक मोठ्या प्रमाणात तुळजापूरकडे पायी चालत जात असल्याने वाहतुकीची कोंडी होवू नये, भाविकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणत्याही प्रकारचा अपघात होवून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी भाविक पायी चालत जाणारे मार्गावरील वाहने अन्य मार्गाने वळविण्यात येणार आहेत.  
भाविकांचे सुरक्षिततेच्या कारणावरुन खालीलप्रमाणे वाहतुक मार्गात बदल करण्यात  आले आहेत. ७ ऑक्टोबर २०२२ रोजीपासून १० ऑक्टोबर २०२२ रोजीचे २४ वा. दरम्यान खालील मार्गावरून पथक्रमण करण्यास अत्यावश्यक सेवेची वाहने वगळून सर्व प्रकारच्या वाहनास मनाई करण्यात येत आहे.

--------------
पथक्रमण करण्यास मनाई करण्यात आलेले मार्ग

तुळजापूर ते सोलापूरकडे येणाऱ्या वाहतुकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर, तामलवाडी, सोलापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास सोलापूर, तामलवाडी, तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. तुळजापूर ते बार्शीकडे येणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास तुळजापूर, ढेकरी, गौडगाव, बार्शी या दरम्यान मनाई करण्यात आली आहे. बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुकीस पथक्रमण करण्यास बार्शी, गौडगाव, ढेकरी, तुळजापूर या दरम्यान मनाई करण्यात आली आहे.

------------
या मार्गावरील वाहने खालीलप्रमाणे मार्गक्रमण करतील 
तुळजापूर ते सोलापूरकडे येणारी वाहतुक मंगरुळपाटी हटकल, बोरामणी मार्ग पथक्रमण करतील. सोलापूर ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुक बोरामणी, इटकळ -मंगरुळपाटी मार्ग पराक्रमण करतील. तुळजापूर ते बार्शीकडे येणारी वाहतुक तुळजापूर, उस्मानाबाद, पैराम, बार्शी मार्ग पथक्रमण करतील.  बार्शी ते तुळजापूरकडे जाणारी वाहतुक बाशी, वैराग, उस्मानाबाद, तुळजापूर मार्ग पथक्रमण करतील.

-------

अत्यावश्यक वाहनांना बंदी नाही

पोलीस, रुग्ण सेवा, अग्निशमन दलाचे वाहने व अत्यावश्यक सेवेतील वाहने तसेच एस. टी. बसेस या वाहनांना ही बंधने लागू राहणार नाहीत. ७ ऑक्टोबर २०२२ रोजीपासून १० ऑक्टोबर २०२२ रोजीचे २४ वा. दरम्यान तुळजापूर घाट हा सर्व प्रकारच्या वाहतुकीस बंद असणार आहे, याबाबतचे आदेश श्रीमती सातपुते यांनी जाहीर केले आहेत.

Web Title: Changes in traffic routes on the occasion of Shri Tuljabhavani Sharadiya Navratri Festival; Learn about alternative ways

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.