बंगळुरू-मुंबई गाडीच्या मार्गात अठ्ठावीस दिवसांसाठी केला बदल

By appasaheb.patil | Published: January 19, 2019 01:03 PM2019-01-19T13:03:26+5:302019-01-19T13:07:36+5:30

सोलापूर : कधी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील दुहेरीकरणाच्या कामामुळे तर कधी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बंगळुरू विभागात रेल्वे स्टेशनवर पीटलाईन ...

Changes made to the Bangalore-Mumbai train for twenty-eight days | बंगळुरू-मुंबई गाडीच्या मार्गात अठ्ठावीस दिवसांसाठी केला बदल

बंगळुरू-मुंबई गाडीच्या मार्गात अठ्ठावीस दिवसांसाठी केला बदल

Next
ठळक मुद्दे सोलापूर रेल्वेस्थानकावरून धावणाºया सोलापूर-हसन एक्स्प्रेसला १ डबा वाढविण्यात आलासध्या सोलापूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाने वेग घेतलाबंगळुरू विभागात रेल्वे स्टेशनवर पीटलाईन २ व ३ मधील कामामुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाºया गाड्या सातत्याने रद्द

सोलापूर : कधी मध्य रेल्वेच्यासोलापूर विभागातील दुहेरीकरणाच्या कामामुळे तर कधी दक्षिण पश्चिम रेल्वेच्या बंगळुरू विभागात रेल्वे स्टेशनवर पीटलाईन २ व ३ मधील कामामुळे सोलापूर रेल्वे स्थानकावरून धावणाºया गाड्या सातत्याने रद्द करण्यात येत आहेत़ त्यामुळे रेल्वेने प्रवास करणाºयांचे नियोजन कोलमडत असल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली आहे़ दरम्यान, इंद्रायणी एक्स्प्रेसनंतर आता २८ दिवसांसाठी मुंबई-बंगळुरू गाडीसह काही गाड्या रद्द (आंशिक) करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने दिली.

सध्या सोलापूर विभागात रेल्वेचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाच्या कामाने वेग घेतला आहे़ याशिवाय मध्य रेल्वेमधील विविध रेल्वे स्टेशनवर नूतनीकरणाचे काम सुरू आहे़ त्यामुळे मागील काही दिवसांपासून या ना त्या गाड्यांच्या वेळेत बदल, मार्गात बदल तर वेळ पडली तर गाड्या रद्द करण्यात येत आहेत; मात्र तत्पूर्वी त्याबाबतच्या सूचना प्रवाशांना तत्काळ देण्यात येत आहेत; मात्र नियोजित प्रवासाला अडथळा येत असल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून येत असल्याची माहिती समोर आली आहे.

मागील काही दिवसांपासून दुहेरीकरणाच्या कामासाठी इंद्रायणी एक्स्प्रेस रद्द करण्यात आली होती़ आता ही सुरळीत सुरू आहे; मात्र अनेकदा रेल्वे प्रशासनाकडून ब्लॉक घेण्यात येत असल्याने बºयाच वेळा या इंद्रायणी एक्स्प्रेसलाही ब्रेक लागत आहे़ याशिवाय अन्य गाड्यांच्या वेळेत व मार्गात बदल करण्यात आला होता़ आता ही सेवा सुरळीत सुरू आहे़ 

रेल्वे गाडीच्या थांब्यामध्ये बदल

  • - १९ जानेवारी ते १७ फेबु्रवारी २०१९ पर्यंत गाडी क्रमांक ११३०१ मुंबई-बंगळुरू उद्यान एक्स्प्रेस ही गाडी आपल्या निर्धारित स्थानकापर्यंत न धावता मुंबई ते येलहनका जंक्शनपर्यंतच धावणार आहे़ ही गाडी येलहनका जंक्शन ते बंगळुरू स्थानकापर्यंत धावणार नाही़
  • २० जानेवारी ते १८ फेबु्रवारीपर्यंत गाडी क्रमांक ११३०२ बंगळुरू-मुंबई उद्यान एक्स्प्रेस ही गाडी आपल्या निघणाºया स्थानकापासून न धावता सदर गाडी येलहनका जंक्शन ते मुंबईपर्यंत धावणार आहे़ ही गाडी बंगळुरू ते येलहनका जंक्शन स्थानकादरम्यान धावणार  नाही़ 

सोलापूर-हसन एक्स्प्रेसचा डबा वाढविला
- मध्य रेल्वेच्या सोलापूर रेल्वेस्थानकावरून धावणाºया सोलापूर-हसन एक्स्प्रेसला १ डबा वाढविण्यात आला आहे़ आता या एक्स्प्रेसला २ ब्रेकयान, ११ स्लीपर, ४ जनरल, २ एसी-२ टियर-३ एसी, ३ टियर, १ एसी फर्स्ट एकूण २३ डबे असणार आहेत़ हा बदल गाडी क्रमांक ११३११ ला २० जानेवारी २०१९ पासून तर गाडी क्रमांक ११३१२ ला २१ जानेवारीपासून बदल होणार आहे़ 

Web Title: Changes made to the Bangalore-Mumbai train for twenty-eight days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.