आषाढीपूर्वी रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी वाहतूक मार्गात बदल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:25 AM2021-07-14T04:25:41+5:302021-07-14T04:25:41+5:30
पंढरपूर शहरातून राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या नवीन कराड नाका ते कॉलेज चौक जोडमार्गावरील चौपदरीकरणाचे एका बाजूचे काम पूर्ण ...
पंढरपूर शहरातून राज्यमार्ग व राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या नवीन कराड नाका ते कॉलेज चौक जोडमार्गावरील चौपदरीकरणाचे एका बाजूचे काम पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. आषाढी एकादशी २० जुलैला असल्याने राज्य शासनाने मान्यता दिलेल्या पालखी सोहळ्यांना वाहतुकीसाठी कोणतीही अडचण येऊ नये यासाठी आषाढी वारीपूर्वी काम करण्यात येणार आहे. हा रस्ता काँक्रिटीकरणाच्या कामासाठी वापरण्यात येणारी यंत्रे रुंद असल्यामुळे तसेच बाजूचा रस्ता खोदल्यामुळे जडवाहनांना वाहतुकीसाठी पुरेसा मार्ग मिळत नसल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या व जलद गतीने काम करण्याच्या दृष्टीने वाहतूक मार्गात बदल केला आहे.
पंढरपूर शहरात प्रवेश करणारी जड वाहने कोल्हापूर, विजापूर, सांगली, मिरज, सांगोला, मार्गे येणारी जड वाहने गादेगाव येथून सातारा- पंढरपूर रस्त्यावरून वाखरीमार्गे येतील. पंढरपूर शहरातून बाहेर जाणाऱ्या जड वाहनांबाबत सूचना-अहमदनगर बार्शी, मोहोळ, टेंभुर्णी यामार्गे येणारी जड वाहने कॉलेज चौक, वाखरी येथून पंढरपूर-सातारा रस्त्यावरून गादेगावमार्गे इच्छित स्थळी जातील.