स्वामी समर्थ मंदिराचं बदलतंय रूपडं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2020 04:36 AM2020-12-13T04:36:30+5:302020-12-13T04:36:30+5:30

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिर तसे दीडशे वर्षांपूर्वीचे. मात्र म्हणावा तसा विकास झालेला नाही. भाविकांकडून योगदान देण्याची ...

The changing face of Swami Samarth Mandir! | स्वामी समर्थ मंदिराचं बदलतंय रूपडं!

स्वामी समर्थ मंदिराचं बदलतंय रूपडं!

googlenewsNext

अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ मंदिर तसे दीडशे वर्षांपूर्वीचे. मात्र म्हणावा तसा विकास झालेला नाही. भाविकांकडून योगदान देण्याची तयारी असतानाही जागेअभावी भाविकांना सोयीसुविधा मिळत नव्हत्या. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर सलग आठ महिने बंद होते. तेव्हा मंदिर समितीने एकमताने विचार करून भाविकांना नियोजित जागेत सुविधा देण्याचा प्रयत्न चालवला आहे.

..ही आहेत विकासकामे

ज्योती मंडपासमोर असलेल्या वटवृक्षाची पाने गळून कचरा होत होता. त्याला अल्युमिनियम जाळी बसविण्यात आली आहे. जुन्या काळातील आडाचे सुशोभीकरण केले आहे. त्याच्या वरच्या बाजूला भाविकांना ध्यान, धारणा, जप-तप, वाचन भाविकांना करण्यासाठी सुविधा निर्माण करून देण्यात आली आहे. येथून भाविकांना थेट ‘श्रीं’चे मुखदर्शन होणार आहे. औदुंबर वृक्षांखालची गणपती समोर व वरच्या बाजूला गणेश मंदिरावर, गाभाऱ्यावर, शेजघरावर, आवरण टाकले आहे. हे काम कल्याण-मुंबई येथील चित्रकार प्रकाश दळी यांनी केले आहे.

----

भाविकांच्या सोयीसाठी..

स्थानिक भाविकांना सोय व्हावी या उद्देशाने पूर्वेकडील व उत्तरेकडील दरवाजाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. भाविकांना दर्शन रांगेतून बाहेर जाण्याचा मार्ग सुशोभीकरण करण्यात येत आहे. नारळ फोडण्याची परंपरागत जागा व पिण्याच्या पाण्याची जागा बदलून मंडपाच्या मागच्या बाजूला करण्यात आली आहे.

- -----

तीस वर्षांहून अधिक काळापासून आम्ही स्वामींच्या दर्शनासाठी येतो. त्यांची परिचितीही आम्हाला आली आहे. राज्यातील अनेक मंदिराचे विकास झपाट्याने होत असताना, या मंदिराचा मात्र झालेला नाही. सर्वांनी मंदिराच्या विकासकामी सहकार्य करणे आवश्यक आहे.

- सुंदर जाधव, मुंबई, कविता कपाडिया, फलटण.

------------

मंदिराचा विकास व्हावा ही भाविकांसह मंदिर समितीची अनेक वर्षांपासून इच्छा होती. अखेर आहे त्या नियोजित जागेत विकास करण्याचा निर्णय समितीच्या बैठकीत घेण्यात आला. त्यानुसार लॉकडाऊन कालावधी वाया न घालवता सर्व प्रकरचे कामे मार्गी लागलेले आहेत.

- महेश इंगळे, चेअरमन मंदिर समिती.

----१२अक्कलकोट-स्वामी समर्थ

फोटोओळ:- अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ मंदिर परिसरात होत असलेली विविध विकासकामे.

Web Title: The changing face of Swami Samarth Mandir!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.