जागृत हनुमान मंदिराचे बदलतेय रूपडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 06:43 AM2021-02-05T06:43:24+5:302021-02-05T06:43:24+5:30

गौडगाव जागृत हनुमान मंदिर येथे सोलापूर, मुंबई, पुण्यासह कर्नाटकातील विजापूर, इंडी, कलबुर्गी, आळंद, अफझलपूर अशा विविध ठिकाणचे ...

The changing forms of the awakened Hanuman temple | जागृत हनुमान मंदिराचे बदलतेय रूपडे

जागृत हनुमान मंदिराचे बदलतेय रूपडे

googlenewsNext

गौडगाव जागृत हनुमान मंदिर येथे सोलापूर, मुंबई, पुण्यासह कर्नाटकातील विजापूर, इंडी, कलबुर्गी, आळंद, अफझलपूर अशा विविध ठिकाणचे लाखो भक्त दर्शनासाठी येतात. वाढती गर्दी पाहता भक्तांना सोयीसुविधा निर्माण करून देणे मंदिर समितीचे कर्तव्य आहे. त्यानुसार मंदिर समितीच्या बैठकीत मंदिर सुधारणा करण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. त्यानुसार प्रत्यक्षात कामाला सुरुवातही झाली आहे.

यासाठी मंदिर समितीचे अध्यक्ष श्रीकांत खानापुरे, विश्वस्त सिद्राम वाघमोडे, ज्ञानेश्वर फुलारी, प्रकाश मेंथे, परमेश्वर सुतार, बिरप्पा पुजारी, शांतय्या स्वामी, परमेश्वर पाटील, चौडप्पा सोलापुरे परिश्रम घेत आहेत.

----

मंदिराच्या आवारात राम, लक्ष्मण, सीता, हनुमान, वीरभद्र, लक्ष्मी, दत्तात्रय, विष्णू अशा विविध देवदेवतांचे सुंदर, सुबक अशा मूर्ती बसविण्यात येत आहेत. त्याचे काम कर्नाटक राज्यातील कलबुर्गी जिल्ह्यातील कौलगीचे मूर्तिकार महांतेश फुलारी करीत आहेत. तसेच सभामंडपाचे मार्बल फरशीकरण करणे, आतल्या व बाहेरच्या बाजूला स्टाईल्स फरशी बसविणे, महाद्वाराचे काम नियोजित कामामध्ये २१ भक्त निवासाचे काम आहे.

---

कोट

श्रीक्षेत्र गौडगाव येथील हनुमान मंदिरात विविध प्रकारची विकासकामे सुरू आहेत. लवकरच सर्व कामे मार्गी लावण्याचा प्रयत्न असणार आहे. सध्या आर्थिक नियोजन करून काही मार्गी लावली आहेत. यामुळे भक्तांना सोयी-सुविधा मिळणार आहेत.

- अध्यक्ष श्रीकांत खानापुरे

फोटोओळ:- गौडगाव बु. येथील जागृत हनुमान मंदिरात विविध विकासकामे सुरू आहेत.

----३०अक्कलकोट-गौडगाव--

Web Title: The changing forms of the awakened Hanuman temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.