बदलत्या वस्तीची कहानी; ‘नई जिंदगी’त घडलेल्या पोलीस, शिक्षक, वकील मंडळींनी काळा डाग पुसून दाखविली ‘नई जिंदगानी’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 03:07 PM2019-01-22T15:07:15+5:302019-01-22T15:11:59+5:30
काशिनाथ वाघमारे । सोलापूर : एकेकाळी राहायला जागा नव्हती..ग़ुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सैफनला सुधारण्याची संधी दिली..त्यांनीच वसाहत निर्माण केली..अनेक कुटुंबं वसली..या ...
काशिनाथ वाघमारे ।
सोलापूर : एकेकाळी राहायला जागा नव्हती..ग़ुन्हेगारी पार्श्वभूमीच्या सैफनला सुधारण्याची संधी दिली..त्यांनीच वसाहत निर्माण केली..अनेक कुटुंबं वसली..या वसाहतीतून आता डॉक्टर, इंजिनिअर, वकील, पोलीस अधिकारी घडले़ शिक्षक आणि सुज्ञ नागरिकांची वसाहत म्हणून नई जिंदगीला पाहिले जाऊ लागले..नव्याने जीवन जगणाºया नई जिंदगीने एकात्मता आणि शांततेचाही संदेश दिला आहे.
१९७८ पूर्वी नई जिंदगी अस्तित्वात नव्हती़ या ठिकाणी कोणी असायचे तर ते समाजाला आणि पोलिसांना त्रासदायी होते़ त्यामुळे येथे कोणीही वास्तव्याला यायचे नाही़ या परिसरात सैफन मुल्ला ही चर्चेतली व्यक्ती होऊन गेली़ समाजात अनेक घटना घडायच्या तेव्हा अशा व्यक्तींची नावे पुढे यायची़ मजरेवाडीचे तत्कालीन सरपंच महादेव ताकमोगे आणि आप्पासाहेब हत्तुरे यांनी पाणी आणि इतर मूलभूत सेवा-सुविधा देऊन माणुसकी दाखवली.
१९८९ साली दरम्यान खासदार धर्मण्णा सादूल हे निवडणूक लढत होते़ सेवा-सुविधा कुणी देत नसल्याने काही मतदारांनी मतदानावर बहिष्कार घातला. सुशीलकुमार शिंदे यांनी या परिसराला आसरा चौकातून पाईपलाईन टाकून देण्याचे आश्वासन दिले तेव्हा बहिष्कार हटला़ त्यानंतर महापालिकेने १९९२ साली ही वसाहत हद्दवाढ भागात समाविष्ट करुन सेवा- सुविधा दिल्या. विकासकामांच्या रुपातून आणि माणसांनी स्वीकारलेल्या बदलाच्या रुपाने कात टाकली आहे.
या नई जिंदगीतून सध्याला बीडमध्ये कार्यरत असणारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शौकत सय्यद, फौजदार मुबारक शेख, फौजदार नागेश म्हात्रे, अॅड़ राजू म्हात्रे, १० रेल्वे कर्मचारी, पाच सैनिक, २५-३० पोलीस, सिव्हिल इंजिनिअर, डिप्लोमा, तीन एमबीबीएस डॉक्टरसह नगरसेवक बाबामिस्त्री अशी राजकारणे माणसं घडली.
सैफन मुल्ला नव्हे वाल्याचा वाल्मीकी
- नई जिंदगी वसाहत वसवणारा सैफन मुल्ला हा पोलिसांसाठी डोकेदुखी ठरला होता़ पोलिसांचा ससेमिरा मागे असायचा़ एकदा पोलिसांनीच अर्थात तत्कालीन अधिकारी चरणसिंग यांनी त्याला सुधारण्याची संधी दिली आणि यापुढे पोलीस कारवाई थांबेल, अशी ग्वाही दिली़ त्याने ते मानले आणि नई जिंदगीतील अनेक जमिनीवर अनेकांची घरे उभारुन दिली़ ही जागा अर्बन सिलींग होती़ अर्थात वाल्याचा वाल्मीकी असाही प्रवास त्याच्या वाटेला आला़ ही वस्ती वसवण्यात कोरे, म्हेत्रे अशाही काही लोकांचे योगदान आहे़
अन् नई जिंदगी असे नामकरण झाले
- १९७८ च्या नई जिंदगीत ना रस्ता, ना वीज, ना पाणी़ या वस्तीत सैफन मुल्लाने अनेक बांधवांना राहायला जागा दिली़ अनेकांनी छोटा-मोठा व्यवसाय येथे सुुरु केला़ कोणी चहा कँटिन, कोणी सायकल दुकान तर कोणी अन्य व्यवसाय सुरु केला़ आज या नई जिंदगीत जवळपास ५० हजार लोक राहतात़ १९७८ पूर्वी या वसाहतीत काहीच नव्हते़ नव्याने एक नगर वसले़ अनेकांचे संसार नव्याने फुलले़ त्यामुळे सैफन मुल्लाने या परिसराला ‘नई जिंदगी’ असे नामकरण केले़