सोलापूर विद्यापीठ परीक्षांमध्ये सावळा गोंधळ; राष्ट्रवादी विद्यार्थ्यांचे गांधीगिरी आंदोलन
By बाळकृष्ण दोड्डी | Published: February 7, 2023 08:55 PM2023-02-07T20:55:26+5:302023-02-07T20:55:58+5:30
विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये सावळागोंधळ सुरू असून यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे.
बाळकृष्ण दोड्डी, सोलापूर : विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये सावळागोंधळ सुरू असून यामुळे विद्यार्थ्यांना त्रास होत आहे. याचा निषेध नोंदवण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने मंगळवारी गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत विद्यापीठाचा निषेध नोंदविला आहे. चेहऱ्यावर हास्य आणून राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. शिवकुमार गणपूर यांना गुलाबपुष्प दिले. या आंदोलनाची विद्यापीठात चर्चा झाली.
सध्या विद्यापीठाच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी (दि. ६) पहिली परीक्षा झाली. सोमवारी सर्वच परीक्षा केंद्रांवर गाेंधळ उडाला. विद्यार्थ्यांना खूप उशिरा परीक्षा हॉलमध्ये प्रवेश मिळाला. यामुळे विद्यार्थ्यांची धांदल उडाली. याबाबत राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाकडे तक्रार केली आहे. तक्रार करताना गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत पदाधिकाऱ्यांनी विद्यापीठाचे लक्ष वेधले. गुलाबपुष्प स्वीकारून यापुढे परीक्षा ठरल्या वेळेनुसार होतील, असे आश्वासन विद्यापीठाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिले. यावेळी शहराध्यक्ष निशांत सावळे यांच्या अध्यक्षतेखाली आंदोलन झाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"