चप्पळगाववाडी सर्वाधिक अन्‌ सांगवीमध्ये कमी मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:20 AM2021-01-17T04:20:11+5:302021-01-17T04:20:11+5:30

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत १ लाख १३ हजार३२८ मतदारांपैकी ८६ हजार ५५४ जणांनी मतदानाचा हक्क ...

Chappalgaonwadi highest and low turnout in Andh Sangvi | चप्पळगाववाडी सर्वाधिक अन्‌ सांगवीमध्ये कमी मतदान

चप्पळगाववाडी सर्वाधिक अन्‌ सांगवीमध्ये कमी मतदान

Next

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात चुरशीने झालेल्या ग्रामपंचायत निवडणूकीत १ लाख १३ हजार३२८ मतदारांपैकी ८६ हजार ५५४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात तब्बल ७६.३७ टक्के मतदान झाले. प्रचारात स्थानिक मुद्द्यावर भर दिला गेला. सर्वाधिक चप्पळगाववाडी येथे तर सर्वात कमी सांगवी खु. येथे मतदान झाले. तालुक्यात मतदानात महिला एक पाऊल पुढे असल्याचे दिसून येत आहे.

अक्कलकोट तालुक्यात ७२ ग्रामपंचायतींसाठी शुक्रवारी मतदान झाले. उमेदवारी अर्ज माघार घ्यावयाच्या दिवसी नऊ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. हंजगी ग्रामपंचायत निवडणूकीसाठी अर्ज भरलेल्या सा-यांनी माघार घेतल्याने सर्व जागा रिक्त राहिल्या. प्रत्यक्षात ६२ ग्रामपंचायतीसाठी मतदान झाले आहे. या निवडणुकीत नागणसूर, जेऊर, वागदरी, कुरनूर, चपळगाव, हन्नूर, मिरजगी, नागूर, मुगळी ही महत्वाची गावे होती. या टप्प्यात डझनभर गावे संवेधनशील होते. काही किरकोळ घटना वगळता शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. प्रशासनाने सुटकेचा निःस्वास सोडला आहे.

प्रत्येक गावात वीज, पाणी, आरोग्य, रस्ते, या स्थानिक मुद्द्यावर प्रचारात भर देण्यात आला होता. विशेषत: रस्ते, घरकूल, पाणी पुरवठा योजनांवरुन प्रत्येक गावात चर्चा झाली.

नऊ हजार मतदार गावोगावी

या तालुक्यातून मागील अनेक वर्षांपासून नोकरी, व्यवसाय, उधोगधंद्यासाठी परगावी स्थलांतरित झाले आहेत. काही गावात शंभर तर काही गावात त्याहून अधिक मतदार सोलापूर, मुंबई, पुणे, कोल्हापूर, बेंगलोर, सातारा, सांगली आशा विविध मोठमोठ्या शहरात राहतात. त्यापैकी जवळपास ९ हजार मतदार मतदानासाठी गावात दाखल झाले.

---

मतदानात स्त्रिया आघाडीवर

प्रत्यक्षात निवडणूक लागलेल्या ६२ गावांपैकी सर्वाधिक मतदान चप्पळगाववाडीत ९०.७२ टक्के झाले. तीन प्रभाग मिळून ८३० मतदारांपैकी ७५३ मतदारांनी मतदान केले. सर्वात कमी मतदान हे सांगवी खुर्द येथे झाले आहे. १ हजार ८६० मतदारपैकी १ हजार २१० मतदारांनी म्हणजेच ६५.५ टक्के मतदान झाले आहे. या निवडणुकीत तालुक्यात स्त्री मतदार ५३ हजार ९०१ होते. त्यापैकी ४० हजार ४०६ मतदारांनी (७४.९६ टक्के) मतदान केले आहे. पुरुष ५९ हजार ४२० मतदार असून त्यापैकी ४६ हजार १४८ मतदारानी (७७.६६ टक्के) मतदान केले आहे. मतदान करण्यात स्त्रियांचे प्रणाम २२३ ने अधिक आहे.

Web Title: Chappalgaonwadi highest and low turnout in Andh Sangvi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.