माढा तालुक्यातील तीन पोलीस ठाण्यांचा कारभार प्रभारींवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2021 04:15 AM2021-07-08T04:15:56+5:302021-07-08T04:15:56+5:30
माढा तालुक्याची लोकसंख्या ३ लाख २५ हजार आहे. त्यात टेंभुर्णी, माढा व कुर्डूवाडी परिसरात मोठमोठे उद्योगधंदे कार्यरत आहेत. संपूर्ण ...
माढा तालुक्याची लोकसंख्या ३ लाख २५ हजार आहे. त्यात टेंभुर्णी, माढा व कुर्डूवाडी परिसरात मोठमोठे उद्योगधंदे कार्यरत आहेत. संपूर्ण तालुक्यातील सर्व महत्त्वाच्या शहरांबरोबरच ग्रामीण भागातील अनेक गावांत गुन्हेगारी, दरोडा, चोऱ्यामाऱ्या, अवैधरीत्या चालणारे धंदे, अत्याचार अशा प्रकारच्या अनेक घटना घडतात. याचा तपास करताना सहायक पोलीस निरीक्षकांवर मर्यादा येतात.
टेभुर्णीत काही महिन्यांपूर्वी एका वादग्रस्त प्रकरणात अडकल्याने पोलीस निरीक्षक राजकुमार केंद्रे यांची बदली झाल्यानंतर या पोलीस ठाण्याला पोलीस निरीक्षक वरिष्ठांना सापडला नाही. विशेष बाब म्हणजे येथे दोन एपीआय पोलीस ठाण्यात कार्यरत असूनही करमाळा पोलीस ठाण्यात कार्यरत एपीआय सुनील जाधव यांच्याकडे पदभार सोपविला आहे. कुर्डूवाडीत तत्कालीन पीआय रवींद्र डोंगरे यांची वरिष्ठांनी पंढरपूरला बदली केल्यानंतर पीआय म्हणून गोरख गायकवाड यांना चार्ज दिला होता; परंतु आठवड्यातच त्यांचीही बदली करून येथील एपीआय चिमणाजी केंद्रे यांच्याकडे पदभार सोपविला आहे. माढा येथून पीआय भगवान खारतोडे यांची बदली झाल्यानंतर आठवडाभरानंतर सोलापूरहून बदलून आलेले एपीआय श्याम बुवा यांच्याकडे पदभार दिला आहे. त्यामुळे तालुक्यातील सर्व पोलीस ठाण्यात सध्या एपीआय काम पाहत आहेत.
................