कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरली, सोलापुरातील २७३ ग्राहकांवर गुन्हे दाखल

By काशिनाथ वाघमारे | Published: May 15, 2023 05:25 PM2023-05-15T17:25:54+5:302023-05-15T17:26:08+5:30

महाविरणचा झटका, सर्वाधिक २१५ गुन्हे पंढरपूर विभागात

Charges were filed against 273 consumers in Solapur for stealing electricity when the connection was off mahavitaran | कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरली, सोलापुरातील २७३ ग्राहकांवर गुन्हे दाखल

कनेक्शन बंद असताना चोरुन वीज वापरली, सोलापुरातील २७३ ग्राहकांवर गुन्हे दाखल

googlenewsNext

सोलापूर : महावितरणच्या लेखी वीज कनेक्शन कायम स्वरुपी बंद असलेल्या ग्राहकांची मागील काही दिवसांत फेर तपासणी केली असता २७३ ग्राहक चोरून वीज वापरताना सापडले. अशांवर संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहेत. यापैकी पंढरपूर विभागात २१५ सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत.

महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण राज्यभर अशा प्रकारची मोहीम राबविण्यात आली. बारामती परिमंडलात मुख्य अभियंता यांच्या नेतृत्वाखाली महावितरणच्या सर्व क्षेत्रीय अधिका-यांनी या प्रकरणी धडक कारवाई केली. या बंद कनेक्शनच्या ठिकाणी आकडा टाकून वीजचोरी करणे, शेजारील ग्राहकांकडून बेकायदा वीज वापरणे यासारखे प्रकार कारवाईत आढळून आले आहेत. बारामती परिमंडळात एकूण ३२९ ठिकाणी महावितरणकडून पोलिसांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

३८ लाखांचा दंड वसूल करण्यासाठी प्रयत्न..
वारंवार पाठपुरावा करुनही एखाद्या ग्राहकाने वीजबिल भरले नाही तर महावितरणकडून कनेक्शन तात्पुरते बंद केले जाते. पुढील तीन महिन्यातही जर थकबाकीचा भरणा केला नाही तर मात्र कनेक्शन कायमस्वरुपी बंद केले जाते. जोपर्यंत त्या बंद कनेक्शनची थकबाकी व्याज व दंडासहित भरली जात नाही तोवर त्या जागेवर नवीन कनेक्शन दिले जात नाही. बारामती परिमंडलात अशा प्रकारच्या पाच हजारांहून अधिक प्रकरणांची पडताळणी झाली. ज्या ठिकाणी थकबाकीचा भरणा झाला त्यांना वगळून तब्बल ३२९ प्रकरणांत संबंधित पोलीस ठाण्यात त्या ग्राहकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणांमध्ये तब्बल ३७ लाख ९५ हजारांचा दंड आकारण्यात आला असून तो वसूल करण्याची प्रक्रीया सुरू आहे.

वीज चाेरांचे धाबे दणाणले 
सातारा जिल्हा : ०१
सोलापूर जिल्हा : २७३
बारामती मंडल : ५५
एकूण : ३२९

Web Title: Charges were filed against 273 consumers in Solapur for stealing electricity when the connection was off mahavitaran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :electricityवीज