श्रीशैलच्या रथोत्सवात सिद्धरामेश्वरचा नंदिध्वज फिरवत केला जयघोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:21 AM2021-04-17T04:21:30+5:302021-04-17T04:21:30+5:30

सोलापूर : भोवतालच्या राज्यातील संस्कृतीचा प्रभाव एकमेकांवर असल्याचा अनुभव श्रीशैलमधील रथोत्सवात सोलापूरकरांनी अनुभवला. उगादी (गुढीपाडवा) सणाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे ...

In the chariot festival of Srisailam, the flag of Siddharmeshwar was waved | श्रीशैलच्या रथोत्सवात सिद्धरामेश्वरचा नंदिध्वज फिरवत केला जयघोष

श्रीशैलच्या रथोत्सवात सिद्धरामेश्वरचा नंदिध्वज फिरवत केला जयघोष

Next

सोलापूर : भोवतालच्या राज्यातील संस्कृतीचा प्रभाव एकमेकांवर असल्याचा अनुभव श्रीशैलमधील रथोत्सवात सोलापूरकरांनी अनुभवला. उगादी (गुढीपाडवा) सणाच्या दिवशी दरवर्षीप्रमाणे यंदाही रथोत्सव पार पडला. या रथोत्सवात सोलापुरातील शंभर तरुण सहभागी होत ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचा नंदिध्वज फिरवत एकदा भक्त लिंग हरबोलाचा जयघोष केला.

दरवर्षी गुढीपाडव्याला आंध्रातील श्रीशैल येथे उगादी सणानिमित्त रथोत्सव निघतो. मागील तीन वर्षापासून ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यांचा नंदिध्वज या रथोत्सवात सहभागी होत आहे.

----------

श्रीशैल पदस्पर्श

या रथोत्सवात श्रीशैल यांचा पदस्पर्श महत्त्वाचा मानला जातो. मात्र यंदा कोरोनामुळे त्यावर बंदी घालण्यात आली होती. गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी साडेपाच वाजता जयघोषात रथोत्सव सुरू झाला या रथोत्सवात सिद्धरामेश्वर यांचा नंदिध्वज हा शिरोभागी होता. शेळगी परिसरातील अनेक युवक हा नंदिध्वज पेलवत दीड तास फिरवला. हा नंदिध्वज दरवर्षी श्रीशैल येथील सोलापूर अन्नछत्र लयात ठेवतात. दर महिन्याला एक व्यक्ती या नंदिध्वजाला तेल घालतो. मात्र उत्सवानंतर हा नंदिध्वज वर्षभर श्रीशैल येथील अन्नछत्रालयातच राहतो.

या रथोत्सवात बाराबंदतील सोलापूरच्या युवकांनी लक्ष वेधले. उगादीच्या आदल्या दिवशी हा नंदिध्वज श्रीशैल देवाच्या मंदिरात आणला जातो. रथोत्सवानंतर पाताळ गंगेत स्नान घालून तो पुन्हा अन्नछत्रालयात ठेवतात.

रथोत्सवाच्या महिनाभरापूर्वी सोलापूरमधून शेळगी, बाळीवेस आणि इतर भागातून जवळपास २०० लोक विविध संस्थांच्या माध्यमातून सहभागी होतात. यंदा सिद्धेश्वर सेवा संस्थेचे अध्यक्ष शैलेश वाडकर, गुरुनाथ तारापुरे, श्रीशैल कोळी, सुदेश बाभुळगावकर, गणेश कोरे, सोमनाथ आवजे, सोमनाथ म्हेत्रे, प्रशांत ढेपे, साईनाथ अंजीखाणे, किरण अक्कलकोटे, सिद्धाराम माळगे, सागर बिराजदार, शंकर बंडगर, काशीनाथ हावगी, अशोक राजमाने, लक्ष्मण यलशेट्टी, आनंद मंठाळे, मल्लिनाथ रमनशेट्टी, महादेव मुंजे, रोहित दहिटणे, राहुल धुत्तरगी, सोमनाथ यलशेट्टी, राजू देशमुख यांनी नंदिध्वज पेलण्यासाठी पुढाकार घेतला. रथोत्सवाच्या महिनाभरापूर्वी सोलापूरमधून शेळगी, बाळीवेस आणि इतर भागातून जवळपास दोनशे लोक विविध संस्थांच्या माध्यमातून या यात्रेत सहभागी होतात.

-------

जंगलातून प्रवास

सोलापूरमधील भक्तांना श्रीशैलमध्ये पोहोचायला महिनाभराचा कालावधी लागतो. सोलापुरातून जवळपास शंभर लोक या श्रीशैल रथोत्सवात सहभागी होतात. एक महिना आधी हे भक्तगण एका टेम्पोतून अन्नधान्य घेऊन हसनपूर येथील जंगल पार करतात. या जंगलातून वाटा शोधत प्रवास करावा लागतो.

----

सोलापूरचा नंदिध्वज श्रीशैल रथोत्सवात फिरवण्याची संकल्पना तरुणांच्या मनात आली. याचा आनंद द्विगुणित आहे. दरवर्षी रथोत्सवापूर्वी सोलापूरचे युवक जवळपास पाच हजार भक्तांना सोलापुरी कडक भाकरी आणि पिठले यांचा प्रसाद देऊन सेवाभाव मानतात.

- शंकर बंडगर

सदस्य, सिद्धेश्वर सेवा संस्था

-----

१६ बंडगीर १ आणि बंडगर २

सिद्धेश्वर सेवा संस्थेच्या युवकांनी श्रीशैलमधील रथोत्सवात सिद्धरामेश्वरांच्या नंदिध्वजाची मिरवणूक काढली.

Web Title: In the chariot festival of Srisailam, the flag of Siddharmeshwar was waved

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.