..अन् संभाजीराजेंनी चालविली रिक्षा, पाहणारे चकीत; जाणून घ्या नेमकं कारण
By Appasaheb.patil | Published: August 6, 2023 06:55 PM2023-08-06T18:55:38+5:302023-08-06T18:55:52+5:30
छत्रपती संभाजीराजे पंढरपूरच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
आप्पासाहेब पाटील, सोलापूर: माजी खासदार छत्रपती संभाजी राजे हे रविवारी पंढरपुरात आले होते. संभाजीराजे यांनी रविवारी श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले. यावेळी समिती सह अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी त्यांचा सन्मान केला. त्यानंतर शिवरायांचा विचार रुजवणाऱ्या विष्णू शेटे या रिक्षा चालकांचे कौतुक करून छत्रपती संभाजीराजे पंढरपूरच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.
याचवेळी पत्रकारांशी संवाद साधताना राज्यातील राजकीय पक्ष मराठा , धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा निवडणुकीत घेऊन लढतात मात्र हा मुद्दा निवडणुकीचा होऊ नये, अशी मागणी स्वराज्य पक्षाचे प्रमुख छत्रपती युवराज संभाजीराजे यांनी केली आहे. माजी खासदार छत्रपती संभाजी राजे यांनी पंढरपूर येथे चक्क रिक्षा चालवली. आणि शिवरायांचा विचार रुजवणाऱ्या विष्णू शेटे या रिक्षा चालकांचे कौतुक केले. छत्रपती संभाजीराजे पंढरपूरच्या रस्त्यावर रिक्षा चालवताना पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. पंढरपूरच्या विष्णू शेटे या रिक्षा चालकांचा रिक्षांवर रायगडाची आणि शिवाजी महाराज यांची अश्वारूढ मूर्ती आहे. ह्याच प्रतिकृतीचे संभाजी राजे यांनी कौतुक केले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
पुढे ते म्हणाले, स्वराज्य पक्षाच्या बांधणीसाठी संभाजीराजे सध्या दौऱ्यावर आहे. यावेळी त्यांनी सध्याची राजकीय अस्थिरता आहे. लोकांसाठी कामे होत नाहीत. अशी अवस्था आहे. सामाजिक मुद्द्यांना राजकीय मुद्दे बनवून मते मागितली जातात. हे योग्य नाही. आरक्षण सारखे सामाजिक प्रश्न सोडवले पाहिजेत असेही ते म्हणाले. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते.