ॲम्बूलन्समध्ये बसून थेट परीक्षा केंद्रावर हजर! रसायन शास्त्राचा पेपर लिहिला सलाईन लावून
By प्रताप राठोड | Published: March 1, 2023 06:59 PM2023-03-01T18:59:00+5:302023-03-01T18:59:44+5:30
आजारी असलेल्या बारावीच्या विद्याथ्यानीने बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर हा सलाईन लावून दिला.
सोलापूर : आजारी असलेल्या बारावीच्या विद्याथ्यानीने बुधवारी रसायनशास्त्राचा पेपर हा सलाईन लावून दिला. परिक्षा बुडू नये, म्हणून करमाळा तालुक्यातील यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात प्रेरणा बाबर या विद्यार्थीने ॲम्बूलन्समध्ये बसून थेट परिक्षा केंद्र गाठून परिक्षेसाठी हजर राहिली.
सध्या बारावीच्या परिक्षा चालू आहेत. परिक्षा काळामध्येच प्रेरणा ही आजार पडली. तिच्यावर उपचार चालू होते. दरम्यान बुधवारी तिचा रसायन शास्त्र विषयाचा पेपर होता. बाराचीचे महत्वाचे वर्ष असल्यामुळे पेपर चुकवायचा नाही, अशा निर्णय घेत प्रेरणा ही ॲम्ब्यूलन्सने परिक्षा केंद्रावर हजर झाली.
विद्याथ्यानीची ही धडपड पाहून केंद्र संचालकांनी योग्य बैठक व्यवस्था केली. तिने सलाईन घेत पेपर लिहीला. तिचा पेपर चालू असताना वैद्यकीय टीमने देखील काळजी घेतली. आजारी असताना देखील परीक्षा दिल्याचे समाधान तिच्या चेहऱ्यावर जाणवत होते.