सोलापुरात छत्रपती शिवाजी स्मारक समिती स्थापन; मागण्यांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार

By Appasaheb.patil | Published: February 15, 2023 03:29 PM2023-02-15T15:29:08+5:302023-02-15T15:29:27+5:30

जिल्हा आरोग्य केंद्राचे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला रुग्णालय असे नामकरण करण्यात यावे यासह अन्य मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या.

Chhatrapati Shivaji Memorial Committee established in Solapur Will meet Chief Minister, Deputy Chief Minister for demands | सोलापुरात छत्रपती शिवाजी स्मारक समिती स्थापन; मागण्यांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार

सोलापुरात छत्रपती शिवाजी स्मारक समिती स्थापन; मागण्यांसाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना भेटणार

googlenewsNext

सोलापूर : जुना पुणे नाका ते सात रस्ता उड्डाणपुलामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे सुशोभिकरण करावे, छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंहासनारूढ पुतळा बसवावा, जिल्हा आरोग्य केंद्राचे राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब महिला रुग्णालय असे नामकरण करण्यात यावे यासह अन्य मागण्याही यावेळी मांडण्यात आल्या. 

राज्यात असलेले सरकार समितीच्या मागण्या मान्य करेल राज्यात असलेले सरकार हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे आहे, म्हणून समितीने केलेल्या या तीनही मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षणमंत्री गिरीष महाजन यांच्यासह जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे नेते, खासदार, आमदार यामध्ये लक्ष देऊन या मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. या मागण्या पूर्ण करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली असून या समितीत ११ पदाधिकारी व सदस्य म्हणून १०० जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

यावेळी निमंत्रक अमोल शिंदे,  दिलीप कोल्हे, अनंत जाधव, दास शेळके, सुनील रसाळे, दत्तात्रय मुळे,  शेखर फंड, तुकाराम मस्के, प्रशांत इंगळे, विनायक महिंद्रकर, संजय शिंदे, शशी थोरात, हेमंत पिंगळे, बाळासाहेब पुणेकर, रवी मोहिते, राजू सुपाते, किरण पवार आदी शेकडो शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Web Title: Chhatrapati Shivaji Memorial Committee established in Solapur Will meet Chief Minister, Deputy Chief Minister for demands

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.