पिंजºयात मगरीसाठी चिकन तर बिबट्याला जिवंत शेळी !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2020 03:18 PM2020-08-28T15:18:06+5:302020-08-28T15:19:51+5:30
देगाव नाल्यात लावल्या जाळ्या; मगर व बिबट्याचा शोध सुरूच
सोलापूर : सध्या सोलापूर जिल्ह्यामध्ये ‘पिंजरा’ प्रचंड गाजत आहे. सोलापूर शहरातील देगावच्या नाल्यावर मगरीसाठी तर मोहोळ तालुक्यातील शिवारात बिबट्यासाठी पिंजरे लावण्यात आले आहेत. विशेष म्हणजे बिबट्याला आमिष म्हणून जिवंत शेळी तर मगरीला आमिष म्हणून सडलेले चिकन ठेवण्यात आले आहे.
देगाव परिसरातील मगर पकडण्यासाठी वनविभागातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. त्यांच्या विनंतीवरून पुण्यातील ‘रेस्क्यू’ या संस्थेतील सात जणांचे पथक सोलापुरात आले आहे. या पथकाने देगाव नाला परिसराची पाहणी केली. तसेच तिथे चार जाळ्या व एक पिंजराही लावण्यात आला आहे.
मगरीला फिरण्यासाठी मोठा परिसर असल्याने तिला पकडणे थोडे अवघड जाणार आहे. यामुळे एका विशिष्ट परिसराच्या बाहेर मगर जाऊ नये, यासाठी पथकातर्फे प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी नाल्यामध्ये चार ठिकाणी जाळ्या लावण्यात आल्या आहेत, त्यामुळे मगर पलीकडे जाणार नाही. त्याच परिसरात मगर पकडण्यासाठी एक पिंजराही लावण्यात आला आहे.
पिंजºयामध्ये मगर यावी, यासाठी तिथे मांसाचे तुकडे ठेवण्यात आले आहेत. मगर ही वासाने आकर्षित होते. पिंजºयामध्ये सडलेले मांस ठेवल्यास त्याच्या उग्र वासाने मगर पिंजºयात येईल, हा यामागचा उद्देश आहे. पिंजºयामध्ये एक किलो कोंबडीचे मांस एका हुकाला लावण्यात आले आहे. मगर पिंजºयात येऊन मांस खाण्यासाठी चिकनला ओढेल. या दरम्यान हुकद्वारे पिंजºयाचा दरवाजा आपोआप बंद होऊन मगर अडकू शकते.
जाळी लावण्यासाठी पथकाने बोटीची मदत घेतली. दिवसभर हे पथक देगाव परिसरातच होते. यादरम्यान त्यांना मगर दिसली. मगर नेमकी कोणत्या परिसरात फिरू शकते याचा अंदाज घेऊन पथकाने जाळी आणि पिंजरा लावला आहे. या कामात नागरिकांचा अडथळा होऊ नये म्हणून वन विभागाचे कर्मचारी परिसरात तैनात करण्यात आले आहे, असे वन परिमंडळ अधिकारी चेतन नलावडे यांनी सांगितले.
गेल्या अनेक दिवसांपासून मोहोळ आणि करमाळा तालुक्यात हैदोस माजविणाºया बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाकडून पिंजºयाची व्यवस्था केली आहे. मोहोळ तालुक्यातील घाटणे येथे पवार वस्तीवर पिंजरा लावण्यात आला आहे. बिबट्या या पिंजºयाकडे आकर्षित व्हावा, यासाठी आतमध्ये त्याची शिकार म्हणून शेळीला ठेवण्यात आले आहे. भक्ष्याच्या निमित्ताने तो पिंजºयाकडे आकर्षित व्हावा, या दृष्टीने ही व्यूहरचना आखली असल्याचे सांगण्यात आले.