सरन्यायाधीश उदय लळीत सोलापुरात, राज्यस्तरीय वकील परिषदेचे उद्घाटन
By रूपेश हेळवे | Published: October 16, 2022 11:16 AM2022-10-16T11:16:27+5:302022-10-16T11:16:48+5:30
सोलापूर : भारताचे सर न्यायाधीश आणि सोलापूरचे भूमीपुत्र उदय लळीत यांच्या हस्ते राज्यस्तरीय वकील परिषदेचे सोलापुरात उदघाटन करण्यात आले. ...
सोलापूर : भारताचे सर न्यायाधीश आणि सोलापूरचे भूमीपुत्र उदय लळीत यांच्या हस्ते राज्यस्तरीय वकील परिषदेचे सोलापुरात उदघाटन करण्यात आले. यावेळी, महाराष्ट्र व गोवा बार कौन्सिल व सोलापूर बार असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूरच्या सुपुत्राची भारताचे सरन्यायाधिशपदी निवड होण्याची पहिलीच वेळ असल्याचे औचित्य साधून बार कौन्सिलचे अध्यक्ष ॲड. मिलिंद थोबडे यांच्या संकल्पनेतून हा सत्कार होणार आहे. सकाळी १०.३० वाजता हा कार्यक्रम सुरू झाला असून यावेळी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती दिपंकर दत्ता, उच्च न्यायालयातील न्यायमुर्ती पी.के. चव्हाण, न्यायमुर्ती विनय जोशी, न्यायमूर्ती एन.जे. जमादार, बार कौन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष मननकुमार मिश्रा, महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी व सोलापूर जिल्हयाचे प्रमुख जिल्हा न्यायाधिश डॉ. शब्बीर अहमद औटी यांची विशेष उपस्थिती आहे. सरन्यायाधीशांना ऐकण्यासाठी अनेक वकिल मंडळींनी येथे हजेरी लावली आहे. दरम्यान, सोलापूर शहरात कडक पोलीस बंदोबस्त तैनात आहे.