सोलापूर महापालिकेच्या वादाचे काय घेऊन बसलात, विकासाचे बोला़, पुढील आठवड्यात पाणीपुरवठा योजना मंजूर करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 01:52 PM2018-02-13T13:52:28+5:302018-02-13T13:53:56+5:30

महापालिकेतील गटबाजीबाबत आपण आदेश देऊनही परिणाम दिसत नाहीत असे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादाचे जाऊ द्या विकासाचे बोलू असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली़.

Chief Minister Devendra Fadnavis approves water supply scheme in next bus, talk about development, solve the issue of Solapur Municipal Corporation | सोलापूर महापालिकेच्या वादाचे काय घेऊन बसलात, विकासाचे बोला़, पुढील आठवड्यात पाणीपुरवठा योजना मंजूर करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

सोलापूर महापालिकेच्या वादाचे काय घेऊन बसलात, विकासाचे बोला़, पुढील आठवड्यात पाणीपुरवठा योजना मंजूर करतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

googlenewsNext
ठळक मुद्देउस्मानाबाद दौºयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर विमानतळाकडे जात असताना होटगी रोडवरील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली़ सोलापूर महापालिकेने सादर केलेली पहिल्या टप्प्यातील ६९२ कोटीची पाणीपुरवठा योजनेला पुढील आ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसठवड्यात मी मंजूरी देणार :


आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर दि १३ : महापालिकेतील गटबाजीबाबत आपण आदेश देऊनही परिणाम दिसत नाहीत असे विचारले असता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वादाचे जाऊ द्या विकासाचे बोलू असे म्हणत या प्रश्नाला बगल दिली़ सोलापूर महापालिकेने सादर केलेली पहिल्या टप्प्यातील ६९२ कोटीची पाणीपुरवठा योजनेला पुढील आठवड्यात मी मंजूरी देणार आहे असे सांगितले़
उस्मानाबाद दौºयानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सोलापूर विमानतळाकडे जात असताना होटगी रोडवरील सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी भेट दिली़ यांच्यासमवेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, महापौर शोभा बनशेट्टी, भाजपाचे जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष प्रा़ अशोक निंबर्गी, नागेश वल्याळय दैदिप्य वडापूरकर आदी मान्यवर व भाजपा पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते़
सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी उपवासाच्या फराळाचे शाबदाणा, खिचडी, भगर आदी उपवासांच्या पदार्थांचा आस्वाद घेऊन मुख्यमंत्री फडणवीस व केंद्रीयमंत्री गडकरी हे विमानतळाकडे रवाना झाले़ यावेळी गाडीत बसत असताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला़ 

Web Title: Chief Minister Devendra Fadnavis approves water supply scheme in next bus, talk about development, solve the issue of Solapur Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.