मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा आज सोलापूर दौरा
By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2018 10:39 AM2018-02-13T10:39:15+5:302018-02-13T12:03:51+5:30
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत.
सोलापूर - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौ-यावर आहेत. आज सकाळी विमानतळावर त्यांचे आगमन झाले. या दोन्ही नेत्यांच्या स्वागतासाठी पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासह महापौर शोभाबनशेट्टी व भाजपचे कार्येकर्ते उपस्थित होते.
उस्मानाबाद जिल्ह्यातील मार्डी येथे विश्वकर्मा औद्योगिक प्रशिक्षण केंद्राचा शिलान्यास समारंभाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. दरम्यान, मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या दौ-याच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट पोलीस बंदोबत तैनात करण्यात आला आहे.
विमानतळावर जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी राजेंद्र भारुड ,पोलीस आयुक्त महादेव तांबडे, ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विरेश प्रभू, पोलीस उपआयुक्त पौर्णिमा चौगले, पोलीस उपआयुक्त अपर्णा गीते, एमआयडीसी पोलीस ठाण्यांचे पोलीस निरीक्षक कमलाकार पाटील यांच्यासह पोलीस अधिकारी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. तसेच शिखर बँकेचे अविनाश महागावकर, भाजपा जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, सांगोला भाजपा तालुका अध्यक्ष श्रीकांत देशमुख, शहर भाजपाचे मनोहर डांगरे यांच्यासह आदींची उपस्थिती होती.
पुन्हा दुपारी दोन्ही मंत्री सोलापुरात
मार्डी येथील कार्यक्रम पार पाडल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दुपारी 2 वाजता सोलापुरात परततील.