केसीआर यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जोडले हात! महापूजेसाठी पंढरपूरला रवाना
By राकेश कदम | Published: June 28, 2023 09:34 PM2023-06-28T21:34:00+5:302023-06-28T21:35:25+5:30
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हात जाेडले आणि निघून गेले.
सोलापूर - आषाढी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा करण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता साेलापुरातून पंढरपूरकडे रवाना झाले. श्री विठ्ठल रुक्मिणीने राज्यातील जनतेला सुखी ठेवावे, अशी प्रार्थना करेन, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाचे प्रमुख आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हात जाेडले आणि निघून गेले.
तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रेशखर राव तेलगंणा सरकारचे अख्खे मंत्रीमंडळ घेउन दाेन दिवसांपूर्वी पंढरपुरात आले हाेते. केसीआर यांच्या पंढरपूर दाैऱ्यामुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री घाबरले आहेत. त्यामुळेच पंढरपुरात महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांचे अचानक दाैरे सुरू आहेत अशी टीका बीआरएसच्या नेत्यांनी केली हाेती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत प्रश्न विचारला. यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी हसून हात जाेडले. आता यावर काय बाेलू असे म्हणत निघून गेले.