गोव्याचे मुख्यमंत्री दोन दिवस सोलापूर, कोल्हापूरच्या दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा

By Appasaheb.patil | Published: February 21, 2023 06:59 PM2023-02-21T18:59:54+5:302023-02-21T19:07:37+5:30

गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २२ व २३ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवसाच्या सोलापूर, कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौर्यात ते सोलापूर, माढा, अनगर, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर याठिकाणी भेटी देणार आहेत.

Chief Minister of Goa on a two-day visit to Solapur, Kolhapur; Know detailed tour | गोव्याचे मुख्यमंत्री दोन दिवस सोलापूर, कोल्हापूरच्या दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा

गोव्याचे मुख्यमंत्री दोन दिवस सोलापूर, कोल्हापूरच्या दौऱ्यावर; जाणून घ्या सविस्तर दौरा

googlenewsNext

सोलापूर : गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे २२ व २३ फेब्रुवारी २०२३ या दोन दिवसाच्या सोलापूर, कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. या दौर्यात ते सोलापूर, माढा, अनगर, पंढरपूर, अक्कलकोट, कोल्हापूर याठिकाणी भेटी देणार आहेत.

२२ फेब्रुवारी २०२३ रोजी ते गोवा येथून विमानाने सोलापुरात येणार आहेत. त्यानंतर ते सकाळी ८.१० वाजता आ. सुभाष देशमुख यांच्या निवासस्थानी ब्रेकफास्ट करणार आहेत. त्यानंतर तुळजापूर येथे तुळजाभवानी मातेचे दर्शन घेणार आहेत. दुपारी ते अनगर (ता. मोहोळ) येथे माजी आमदार राजन पाटील यांच्या घरी भेट देणार आहेत. त्यानंतर माढा येथील एका कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रम संपल्यानंतर पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रूक्मिणी मंदिराला भेट देऊन देवदर्शन करणार आहेत. तेथून ते परत माढा येथील एका कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. रात्री सोलापुरात येणार असून त्यानंतर अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्या घरी ते रात्रीचे जेवण करणार आहेत. तेथून ते सोलापुरात येऊन मुक्काम करणार आहेत.

२३ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी ९ वाजता सोलापूर विमानतळाहून कोल्हापूरकडे जाणार आहेत. साडेनऊ वाजता कोल्हापूर येथील श्री. महालक्ष्मी मातेचे दर्शन घेणार आहेत. त्यानंतर टेंबळाईवाडी, कनेरी मठातील येथील सिध्देश्वर मंदीरात दर्शन घेऊन ते कोल्हापूर विमानतळाहून गोव्याकडे प्रयाण करणार आहेत.

Web Title: Chief Minister of Goa on a two-day visit to Solapur, Kolhapur; Know detailed tour

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.