Breaking; आषाढी एकादशीच्या शासकीय पूजेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2020 03:43 PM2020-06-28T15:43:28+5:302020-06-28T15:45:15+5:30
फेसबुक लाईव्ह द्वारे राज्याला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती
सोलापूर : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरातील विठ्ठल रुक्मिणीच्या शासकीय पूजेसाठी उपस्थित राहणार असल्याचे जाहीर केले आहे, राज्यासह देशाला कोरोनापासून मुक्त करावं असे साकडे आपण विठ्ठलाला घालणार असल्याचेही त्यांनी फेसबुक लाइव्हद्वारे साधलेल्या संवादात सांगितले.
आषाढी एकादशीची सुमारे आठशे वर्षापासून परंपरा सुरू आहे. 2010 मध्ये मी पांडुरंगाचे दर्शन घेतले तेव्हा प्रत्यक्ष सहभागी झालो नाही, विठ्ठलाचे विश्वरूप पाहिले ते वारकऱ्यांच्या रूपात. हेलिकॉप्टरमध्ये तेव्हा एरियल फोटोग्राफी केली होती, त्याचे पुढे 'पहावा विठ्ठल' हे पुस्तक आले. वारीतील रिंगण सोहळा हा फक्त आपल्यातच आहे. यावेळी नाइलाज म्हणून वारी रद्द करावी लागली, आपल्या वतीने मी विठ्ठलाला साकडे घालण्यासाठी पंढरपूरला जाणार आहे, आता चमत्कार दाखव आणि महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण देशावरील कोरोनाचे संकट घालव असे साकडे घालणार असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुकला ईदरे साधलेल्या संवादात सांगितले.