चिखर्डे, भालगाव, सासुरे,धामणगावात होणार खुल्या वर्गातील सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:35 AM2021-02-23T04:35:12+5:302021-02-23T04:35:12+5:30
सोमवारच्या आरक्षणामध्ये मागील वेळेस महिलेला असलेल्या अनेक गावांत सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. येथील शासकीय धान्य गोदामात प्रांताधिकारी हेमंत निकम, ...
सोमवारच्या आरक्षणामध्ये मागील वेळेस महिलेला असलेल्या अनेक गावांत सर्वसाधारण आरक्षण पडले आहे. येथील शासकीय धान्य गोदामात प्रांताधिकारी हेमंत निकम, तहसीलदार प्रदीप शेलार, निवासी नायब तहसीलदार संजीवन मुंढे यांनी हे आरक्षण सोडतीद्वारे निश्चित केले. सर्वप्रथम तालुक्यात असलेल्या अनुसूचित जमातीच्या १०११च्या लोकसंख्येच्या टक्केवारीच्या आधारे उतरत्या क्रमाने पूर्वीच्या राखीव जागा वगळून महागाव हे अनुसूचित जमातीच्या महिलेसाठी आरक्षित करण्यात आले. त्यानंतर अनुसूचित जातीची टक्केवारी जास्त, परंतु १९९५ पासून राखीव असलेल्या ग्रामपंचायती वगळून रातंजन, काटेगाव, शेलगाव मा. भोईंजे, चिंचोली/ढेंबरेवाडी, बेलगाव, जोतीबाचीवाडी, मुंगशी आर, कव्हे, रऊळगाव, मालेगाव ही ११ गावे निश्चित करण्यात आली. त्यातून चिठ्ठीद्वारे रातंजन, जोतीबाचीवाडी, मंगशी आर, मालेगाव व कव्हे ही पाच गावे अनुसूचित जाती महिलांसाठी आरक्षित करण्यात आली. हे पूर्वी काढलेले आरक्षण कायम ठेवण्यात आले. याच आधारानुसार आजपर्यंत एकदाही ओबीसी आरक्षण पडले नाही असे एक गाव त्यानंतर १९९५ पासून आरक्षण नसलेली दोन, तर २,००० नंतर आरक्षण पडले नसलेली २४ गावे निश्चित करण्यात आली त्यानंतर चिठ्ठीद्वारे जहानपूर, काळेगाव, गाडेगाव, गौडगाव, हिंगणी पा. रुई व खामगाव ही आठ गावे ना.मा.प्र.साठी निश्चित करण्यात आली.
या ३५ गावांतून ज्या गावात २०१५ला महिला आरक्षण होते व नव्हते यांची निश्चीती करून गावे फिक्स केली गेली. यातून शिल्लक राहिलेली १८ व राहिलेली ६६ गावे सर्वसाधारणसाठी ग्राह्य धरली. त्यातून मागील वेळेस महिला आरक्षण असलेली वगळली. त्यात ३९ गावे निघाल्याने सर्वसाधाण महिलांसाठी दोन चिठ्ठ्या टाकण्यात आल्या़ त्यात घोळवेवाडी व कापशी ही दोन गावे निघाली तर उर्वरित ४१ गावे सर्वसाधारणसाठी निश्चित झाली.
अनुसूचित जमाती निरंक अनुसूचित जमाती महिला-महागाव. अनु.जाती १- काटेगांव, भोईजे, चिंचोली, बळेवाडी, मालेगांव, शेलगाव मा, बेलगाव अनु.जाती महिला-ज्योतीबाचीवाडी, रातंजन, मुंगशी आर, कव्हे, रऊळगाव, नागरिकांचा मागास प्रवर्ग मालवंडी-वैराग, कोरफळे, उपळाई, शेळगांव आर, देवगाव, जामगाव पा, बालवड, बावी, निबळक, कळंबवाडी आ, गोरमाळे, दडशिंगे, काळेगांव, हिंगणी (पा), खामगाव, येळंब.
नागरिकांचा मागास प्रवर्ग - सौंदरे, उपळे दु. रुई धानोरे बाभुळगाव शिराळे यावली गौडगाव जहानपूर ,उक्कडगाव-वाघाचीवाडी, सारोळे गाताचीवाडी/फपाळवाडी इर्लेवाडी गाडेगाव कळंबवाडी(पा) भातंबरे,पिंपळगाव आ, झरेगांव ही आहेत ती ४१ सर्वसाधारण गावे पिपळगाव (पा) , नांदणी , आळजापूर, मिर्झनपूर, बळेवाडी, धामणगाव दु., बोरगाव खु., कुसळंब, सासुरे, पाथरी, अंबेगांव, धोत्रे, चिखर्डे, पिंपरी पा, तावडी, अलीपूर, इंदापूर, झाडी, दहिटणे, लाडोळे, भालगाव, शेंद्री, शेलगाव व्हळे, कांदलगाव, पानगाव, तङबळे, चुंब, उंडेगाव, अंबाबाईचाबाडी, खडकलगांव, तांबेवाडी, भोयरे, आरणगांव, कोरेगांव, ढोराळे, घाणेगाव, संगमनेर, ममदापूर, सुर्डी, तांदुळवाडी, तुळशीदासनगर ही आहे ४१ सर्वसाधारण महिलांसाठी असलेली गावे पांगरी कासारी पांढरी राळेरास कासारवाडी जामगाव आ सर्जापूर हिंगणी आर-चिचखोपन मानेगांव तुर्कपिंपरी उंबरगे साकत रस्तापूर इर्ले चारे खांडवी- गोडसेवाडी, पिंपळगाव पान, भांडेगाव, वांगरवाडी, तावरवाडी, सावरगाव, मांडेगाव, धामणगाव आ, श्रीपतपिंपरी, आगळगाव, पुरी मुंगशी वा, ताडसौंदणे, गुळपोळी, पिंपळवाडी नारी, नारीवाडी, नागोबाचीवाडी-लक्ष्याचीवाडी, पिंपरी आर, भानसळे, घारी, खडकोणी, वाणेवाडी, मळेगाव, हळदुर्ग बोरगाव (झाडी) घोळवेवाडी, कापशी.