चिकनगुनिया, ताप, कणकण, सांधेदुखीने नागरिक बेजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 04:24 AM2021-09-26T04:24:40+5:302021-09-26T04:24:40+5:30
महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत अंतर्गत गट नंबर २ या भागात दत्तनगर, संभाजीनगर, महात्मा फुलेनगर हे भाग येतात. या ठिकाणी जवळपास साडेतीन ...
महाळूंग-श्रीपूर नगरपंचायत अंतर्गत गट नंबर २ या भागात दत्तनगर, संभाजीनगर, महात्मा फुलेनगर हे भाग येतात. या ठिकाणी जवळपास साडेतीन हजार लोकसंख्या आहे. या ठिकाणी रस्ते, गटारी, दिवाबत्तीची सोय नाही. पायाभूत सुविधांचा अभाव आहे. गटारीअभावी जागोजागी पाणी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढल्याने साथीचे रोगही वाढत आहेत. कोरोनाच्या संकटाने घेरले असल्याने इतर आजारांवर बोलायला आता कोणालाही वेळ नाही. त्याचा परिणाम वेळेवर उपचार होत नसल्यामुळे तक्रारी वाढत आहेत.
सांधे दुखणे, बोटे आखडणे, ताप आणि कणकण अशा लक्षणांनी अनेक नागरिक बेजार आहेत. ही सारी लक्षणे चिकनगुनियासारखी आहेत. मात्र तो चिकनगुनिया नाही. असा आजार पावसाळ्यात नैसर्गिक आपत्तीच्या काळात उद्भवतो, असा दावा तज्ज्ञ डॉक्टरांनी केला आहे. या आजारावर वेदनाशामक औषधे घेतली जातात, मात्र ती टाळलेली बरी, असे डॉक्टर सांगतात.
कोट ::::::::::::::::::
गट नंबर २ मध्ये फवारणी करून घेत आहोत. तसेच गटारी स्वच्छतेची कामे करून घेतली जातील.
- डॉ. विश्वनाथ वडजे
मुख्याधिकारी, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत
कोट ::::::::::::::::::::
या भागातील सर्व ठिकाणचे आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सर्वेक्षण करून घरोघरी तपासणी केली जाणार आहे. ग्रामस्थांनीही या आजाराबाबत काळजी घेतली पाहिजे.
- डॉ. समीर शेख
वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र, महाळुंग