वाटंबरेतील महिलेच्या खूनप्रकरणी मुलास जन्मठेप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 04:24 AM2021-04-23T04:24:27+5:302021-04-23T04:24:27+5:30
आरोपी महेश मारुती पवार हा त्याच्या कुटुंबीयांसह शेरेवस्ती येथे राहतो. २६ मार्च २०१७ रोजी घराजवळील समाईक झाड ...
आरोपी महेश मारुती पवार हा त्याच्या कुटुंबीयांसह शेरेवस्ती येथे राहतो. २६ मार्च २०१७ रोजी घराजवळील समाईक झाड तोडण्याच्या कारणावरून तो आणि मृत विमल शंकर पवार, शरद शंकर पवार यांच्यात वाद झाला होता. त्यावेळी आरोपी महेश याने झाड तुझ्या बापाचे आहे का म्हणत आता झाड तोडत नाही, तुम्हालाच तोडतो असे म्हणून दम दिला. तसेच त्याने कुऱ्हाडीने विमलचा मुलगा शरद पवार यांच्या डोक्यात वार केला. हा हल्ला सोडवण्यासाठी विमल ही मधे आली असता महेशने कुऱ्हाडीने तिच्या डोक्याखालील डाव्या कानपट्टीवर, हातावर, पाठीवर वार केले. या मारहाणीत तिचा मृत्यू झाला, तर आरोपी मारुती पवार व कुसुम पवार यांनी जखमींवर दगडफेक केली.
याप्रकरणी रुक्मिणी दशरथ घोरपडे (रा. वाटंबरे, शेरेवस्ती) यांनी फिर्याद दिली होती. पोलिसांनी महेश पवार, मारुती पवार आणि कुसुम पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
सरकार पक्षातर्फे ॲड. आनंद कुर्डूकर, ॲड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले. कोर्ट पैरवी म्हणून पोलीस नाईक माने, तत्कालीन कोर्ट पैरवी पोलीस हेडकॉन्स्टेबल रवींद्र बनकर यांनी सहकार्य केले.
------
११ साक्षीदार तपासले
तत्कालीन पोलीस निरीक्षक हारुण शेख यांनी आरोपी महेश पवार यास सांगोला बसस्थानकासमोर शिताफीने पकडून अटक केली होती. सहायक पोलीस निरीक्षक बी. एस .बिराजदार यांनी या प्रकरणाचा तपास करून पंढरपूर येथील सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणात ११ साक्षीदार तपासले गेले.
-----