अजनसोंड येथे लहान मुलांची आरोग्य तपासणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:15 AM2021-06-11T04:15:58+5:302021-06-11T04:15:58+5:30
० ते १८ वर्षांच्या मुलांना जन्मत:च आजार, कुपोषित मुलांच्या वाढीसंबंधी लक्षणे, कोविडची लक्षणे, व्यंग असणाऱ्या मुलांच्या आरोग्याची तपासणी करणे, ...
० ते १८ वर्षांच्या मुलांना जन्मत:च आजार, कुपोषित मुलांच्या वाढीसंबंधी लक्षणे, कोविडची लक्षणे, व्यंग असणाऱ्या मुलांच्या आरोग्याची तपासणी करणे, त्या मुलांना ताप, सर्दी, जंतनाशक गोळ्या, जीवनसत्त्वाची औषधे देण्यात येत असल्याची माहिती आरोग्य अधिकारी अनुजा निंबाळकर यांनी दिली. यावेळी सरपंच रूपाली घाडगे, अजिंक्य घाडगे, ग्रामसेवक समाधान कांबळे, डाॅ. अनुजा निंबाळकर, आशा वर्कर छाया सपकाळ, राणी आयरे, सुप्रिया बंगाळे, मोहिनी वाघमारे, अंगणवाडी सेविका मंदाकिनी डुबल, स्मिता डुबल, मदतनीस सीता गोसावी, कालिंदा मोरे, आदी उपस्थित होते.
अजनसोंड झाले कोरोनामुक्त
दुसऱ्या लाटेत अजनसोंड येथील ९२ लोकांना बाधा झाली होती. यापैकी पाचजण मृत झाले. कोरोनामुक्त गावासाठी २० एप्रिलपासून प्रत्येक चार दिवसाला सॅनिटायझर फवारण्या केल्या. पॉझिटिव्ह रुग्णांना पंढरपूर येथील कोविड सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्या संपर्कातील लोकांच्या तपासण्या केल्या. कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी आरोग्य उपकेंद्रांतर्फे मास्क, अर्सेनिक अल्बम ३० च्या गोळ्या वाटप केल्या. यामुळे १४ मे रोजी गाव कोरोनामुक्त झाले आहे. याबद्दल प्रांताधिकारी सचिन ढोले व गटविकास अधिकारी रविकिरण घोडके यांनी सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक, पोलीसपाटील, ग्रामपंचायत सदस्य व ग्राम समितीचे कौतुक केले.