मुलाने पटविले वडिलांचे घर
By admin | Published: October 29, 2016 09:23 PM2016-10-29T21:23:51+5:302016-10-29T21:23:51+5:30
घरातील सोने वाटून देत नसल्यामुळे विभक्त राहत असलेल्या मुलानेच आई-वडिलाचे घर पेटवून दिले. ही घटना खळवे (ता. माळशिरस) येथे शनिवारी घडली.
Next
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
वेळापूर, दि. २९ - घरातील सोने वाटून देत नसल्यामुळे विभक्त राहत असलेल्या मुलानेच आई-वडिलाचे घर पेटवून दिले. ही घटना खळवे (ता. माळशिरस) येथे शनिवारी घडली.
मूळचे बोडले येथील पण सध्या खळवे (वेळापूर) येथे राहत असलेल्या राजकुमार विजय माने-देशमुख याने आज आई-वडील राहत असलेल्या घरी गेला़ मला घरचे सोने का वाटून देत नाही? म्हणून आई रत्नमाला यांना शिवीगाळ, दमदाटी करून घरातील दिवाना, शोकेज, कपाट, कपडे यावर डिझेल ओतून स्फोट व्हावा यासाठी घरातील गॅस सिलेंडरचा कॉक चालू करून घरातील सामानास आग लावली.
याबाबत त्याच्या वडिलांनी वेळापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. घटनेची माहिती मिळताच वेळापूर स.पो.नि. विजय यादव यांनी घटनास्थळास भेट देऊन राजकुमार माने-देशमुख यास अटक केली आहे. त्याच्याविरूद्ध भा. द. वि़ ४०६, ३०८, ५०४ व ५०६ नुसार गुन्हा दाखल केला असून तपास स.पो.नि. विजय यादव करीत आहेत.