पोलिसांच्या मारहाणीमुळेच मुलाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:25 AM2021-02-09T04:25:28+5:302021-02-09T04:25:28+5:30

दरम्यान, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृताच्या नातेवाइकांचे म्हणणे ऐकून चौकशीअंती दोषींवर कारवाई करू, असे ...

Child's suicide due to police beating | पोलिसांच्या मारहाणीमुळेच मुलाची आत्महत्या

पोलिसांच्या मारहाणीमुळेच मुलाची आत्महत्या

Next

दरम्यान, सहा. पोलीस निरीक्षक प्रशांत हुले यांनी घटनास्थळी धाव घेऊन मृताच्या नातेवाइकांचे म्हणणे ऐकून चौकशीअंती दोषींवर कारवाई करू, असे आश्वासन दिल्यानंतर मृत दादासो देठे याचे शवविच्छेदन करण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाला. चिकमहूद, ता.सांगोला येथील अल्पवयीन मुलीच्या भावाने रविवारी सांगोला पोलीस स्टेशनला गावातील दादासो देठे याने अज्ञात कारणासाठी माझ्या अल्पवयीन बहिणीला पळवून नेल्याची फिर्याद दाखल केली होती. पोलिसांनी दादासो देठे याच्यावर भादंवि कलम ३६३ अन्वये फूस लावून पळवून नेल्याचा गुन्हा दाखल केला. तपास पोलीस नाईक गणेश मेटकरी यांच्याकडे दिला होता. त्यांनी तत्काळ सूत्रे हलवून त्या अल्पवयीन मुलीला माळशिरस (वेळापूर) येथून ताब्यात घेतले. त्यानंतर संशयित दादासो देठे, त्याच्या आईसह नातेवाईक व अल्पवयीन मुलगी तिचे नातेवाईक यांना महुद येथील पोलीस चौकीला बोलावून दोन्ही बाजूकडील जाबजबाब घेतले, दरम्यान तपासी अधिकारी गणेश मेटकरी यांनी मुलगी अल्पवयीन असल्याने तिची वैद्यकीय तपासणी करावी लागेल असे सांगताच दादासो देठे यांनी भूक लागली आहे. नास्ता करून येऊ असे म्हणून आईसह चौकीतून बाहेर गेले ते परत आलेच नाहीत. त्यानंतर सोमवारी त्याने दु. २ च्या सुमारास घरासमोरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समजले, असे पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर यांनी सांगितले. दरम्यान, याबाबत मृताची आई इंदूबाई शंकर देठे, रा.चिकमहुद हिने खबर दिली असून, पोलिसांनी आकस्मिक मृत्यू अशी नोंद केली आहे.

संशयामुळे पोलिसात तक्रार

मृत दादासो शंकर देठे व अल्पवयीन मुलीचे प्रेम संबंध होते. या कारणावरून दोन्ही कुटुंबात भांडण झाल्यानंतर ते समोपचाराने मिटवलेही होते. त्यावेळी दादासो देठे याने तुझ्या बहिणीचे लग्न कसे करतो तेच बघतो, अशी धमकी तिच्या भावाला दिली होती. दरम्यान मंगळवारी (दि. २) त्या अल्पवयीन मुलीने आई व भाऊ कामावर गेल्याची संधी साधून वडिलांना शेजारी जाते म्हणून दु. ३.३०च्या सुमारास घरातून बाहेर पडली. यावेळी शेजारच्या त्या मुलीने दादासो देठे याच्याकडे बॅग देताना तिला पाहिले होते. यामुळे तिच्या भावाने दादासो देठेवर संशय व्यक्त करून पोलिसात तक्रार दाखल केली होती.

कोट :::::::::

चिकमहूद येथील दादासो देठे याने बहुदा अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर आपलं बिंग फुटेल या भीतीपोटी आत्महत्येचे पाऊल उचलेल असावे. या घटनेशी तपासी अंमलदार गणेश मेटकरी याचा काहीही संबंध नाही. तरीही या प्रकरणाची संपूर्ण चौकशी केली जाईल.

- भगवानराव निंबाळकर,

पोलीस निरीक्षक, सांगोला

Web Title: Child's suicide due to police beating

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.