सिद्धेश्वर कारखान्याची चिमणी जमीनदोस्त, महापालिकेची मोठी कारवाई
By राकेश कदम | Published: June 15, 2023 05:23 PM2023-06-15T17:23:49+5:302023-06-15T17:24:10+5:30
महापालिकेने आणि पोलीस यंत्रणेने बुधवारी पहाटे कारखान्याचे गेट सोडून चिमणी पाडकामाची कारवाई सुरू केली होती.
सोलापूर : विमानसेवेस अडथळा ठरलेली सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी गुरुवारी दुपारी तीन वाजून 52 मिनिटांनी जमीनदोस्त करण्यात आली.
महापालिकेने आणि पोलीस यंत्रणेने बुधवारी पहाटे कारखान्याचे गेट सोडून चिमणी पाडकामाची कारवाई सुरू केली होती. पहाटे सहा वाजता सुरू झालेली कारवाई गुरुवारी दुपारी ३.५२ वाजता संपली. केबलने हिसका मारुन 92 मीटर उंच चिमणी पाडण्यात आली. एवढी कारखाना परिसरात. तगडा बंदोबस्त होता. कारवाईच्या ठिकाणी महापालिका आयुक्त शितल तेली उगले आणि पोलीस आयुक्त राजेंद्र माने यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
विमानसेवेस अडथळा ठरलेली सोलापूर येथील सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी गुरुवारी दुपारी तीन वाजून 52 मिनिटांनी जमीनदोस्त करण्यात आली...#SiddheshwarFactory#Solapurpic.twitter.com/SZf49glfqu
— Lokmat (@lokmat) June 16, 2023