चक्क आठ महिन्यांपासून गायीच्या कासेला तोंड लावून पिते चिमुकली सई!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:24 AM2021-09-21T04:24:25+5:302021-09-21T04:24:25+5:30

करमाळा तालुक्यातील केम येथे परमेश्वर तळेकर यांनी देशी गायींचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले आहे. देशी गायींपासून मिळणारे दूध, तूप, ...

Chimukali Sai has been drinking cow's milk for the last eight months! | चक्क आठ महिन्यांपासून गायीच्या कासेला तोंड लावून पिते चिमुकली सई!

चक्क आठ महिन्यांपासून गायीच्या कासेला तोंड लावून पिते चिमुकली सई!

Next

करमाळा तालुक्यातील केम येथे परमेश्वर तळेकर यांनी देशी गायींचे चांगल्या पद्धतीने संगोपन केले आहे. देशी गायींपासून मिळणारे दूध, तूप, शेण, गोमूत्राला मोठी मागणी आहे. यामुळे तळेकर कुटुंबाने देशी गायींना दैवत मानून शेतीला पूरक व्यवसाय सुरु केला आहे. आपल्या शेतात गायीला गोमाता मंदिर मानून हे कुटुंब गाईंची सेवा करीत असते. या देशी गोमातांमुळे सुखसमृद्धी आणि आर्थिक स्थैर्यही मिळाल्याने परमेश्वर तळेकर देशी गाईंचे महत्त्व सांगत आपल्या दुचाकीवरून परिसरात फिरत असतात.

तळेकरांची आठ महिन्याची नातं सई हिलाही आजोबांप्रमाणे गायींचा विशेष लळा लागलेला. हे पाहून आजोबांनी एक दिवस सईला कपिला गाईचे दूध पिण्यासाठी गोठ्यात नेले. चिमुरड्या सईचे तोंड कपिला गाईच्या आचळाला लागताच गाईने पान्हा सोडला आणि चिमुरडी सई थेट गाईला पिऊ लागली. यानंतर रात्रीदेखील तिला भूक लागल्यावर ती गोठ्यात जाते. त्यावेळी कपिला गाय तिच्या जवळ येऊन उभी राहून तिला आपले दूध पिण्यास देत असे.

----

झपाट्यानं सुधारणा

आता सई दोन वर्षांची झालीय. मात्र आजही तिला भूक लागली की, थेट गोठ्यात जाऊन कपिला गाईच्या कासेला तोंड लावून धारोष्ण दूध पिते. कपात किंवा ग्लासमध्ये दिलेले दूध सई पीत नाही. किंवा कुटुंबासाठी ही थोडी अडचण असली तरी आजोबा परमेश्वर यांच्या मते देशी गाईच्या दूध पिण्याने तिच्यामध्ये झपाट्याने सुधारणा दिसत आहे. सई आता स्पष्ट उच्चारांमध्ये बोलते.

---

वयाच्या मानाने सईमध्ये शारीरिक प्रगतीही झपाट्याने होत असून, ती लवकर चालू लागली आहे. तिची बुद्धिमत्ता इतर लहान मुलांच्या तुलनेत अधिक असल्याचं दिसून येत आहे. देशी गायींच्या संगोपनामुळं आमच्या घरातील इतर मुलंही हुशार आणि सदृढ बनली आहेत.

- परमेश्वर तळेकर, गोपालक, केम

-----

Web Title: Chimukali Sai has been drinking cow's milk for the last eight months!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.