चिमुकल्यांचा किलबिलाट अन्‌ ज्येष्ठांचा विरंगुळा हरवला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2020 04:22 AM2020-12-22T04:22:09+5:302020-12-22T04:22:09+5:30

अक्कलकोट शहरात कारंजा चौकातील तारामता उद्यानाची मोठा इतिहास आहे. संस्थांनिकांनी स्थापना केली आहे. येथे लंडन सरकारने अक्कलकोटच्या राजांना गिफ्ट ...

The chirping of Chimukalya and the relaxation of the elders was lost | चिमुकल्यांचा किलबिलाट अन्‌ ज्येष्ठांचा विरंगुळा हरवला

चिमुकल्यांचा किलबिलाट अन्‌ ज्येष्ठांचा विरंगुळा हरवला

Next

अक्कलकोट शहरात कारंजा चौकातील तारामता उद्यानाची मोठा इतिहास आहे. संस्थांनिकांनी स्थापना केली आहे. येथे लंडन सरकारने अक्कलकोटच्या राजांना गिफ्ट म्हणून त्यावेळी दिलेला मासा चोरीला जाऊन जमाना झाला त्याचाही शोध अद्याप लागलेला नाही. तसेच नवीन राजवाड्याजवळ मृदुलाराजे उद्यानाचीही अवस्था दयनीय झाली आहे. एवन चौकातील स्वामी समर्थ उद्यानाची अवस्था थोडीफार चांगली असली तरी नागरिकांना सुरक्षा नाही. लाखो रुपये खर्च करून ज्येष्ठ नागरिकांच्या नावाने हरितपट्टा म्हणून फत्तेसिंह मैदानाजवळ तयार केलेले नाना-नानी पार्क दीड वर्षांपासून चालू झालेले नाही. बायपास रोडवरील रवींद्रनाथ टागोर उद्यान नावाला राहिलेले आहे. त्याच्यापेक्षा वाईट अवस्था मंगरुळे हायस्कूलजवळील उद्यानाची झाली आहे.

---

दोन माळी त्यांना काम वेगळेच

अक्कलकोट नगरपालिकेकडे १० माळी कार्यरत होते. वेळोवेळी सेवानिवृत्तीनंतर आठ जण घरी गेले. आता केवळ दोन माळी असून, त्यांनाही वेगळेच काम लावलेले आहे. या कामी मुख्याधिकाऱ्यांचे योगदान महत्त्वाचे असते. या कामी एकट्या नगराध्यक्षाचे कर्तव्य नसून नगरसेवकांचीही जबाबदारी महत्त्वाची आहे.

कोट

तीर्थक्षेत्र अक्कलकोट शहरात बाहेर गावाहून हजारो भाविक येत असतात. शहरात फेरफटका मारत असताना कुठेच स्वच्छ, चांगले उद्यान दिसत नाही. लोकांना विरंगुळा व लहान मुलांना सुट्टीच्या दिवशी खेळण्यासाठी एकही उद्याने चांगले नाही. शहराच्या वैभवात भर पडण्यासाठी सर्व उद्याने सुव्यस्थित, अद्ययावत करणे आवश्यक आहे.

- लाडप्पा भंडारे ज्येष्ठ नागरिक

------

कोट:-

शहरातील सर्व उद्याने अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. निविदा काढलेली आहे. लवकरच कामाला सुरू करू. माळी कर्मचाऱ्यांची जागा रिक्त आहे. तोपर्यंत रोजंदारीवर घेण्याचे नियोजन सुरू आहे. त्यासाठी आगामी सर्वसाधारण सभेत चर्चा होईल.

- मुख्याधिकारी गणेश शिंदे, अक्कलकोट.

Web Title: The chirping of Chimukalya and the relaxation of the elders was lost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.