"चिऊ मला माफ कर; जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका", मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2024 10:19 AM2024-06-19T10:19:30+5:302024-06-19T10:20:41+5:30

मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या देठे यांच्या मृत्यूनंतर बार्शीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

"Chiu forgive me; Jarange Saheb don't retreat without taking reservation", Marathas ended their lives for reservation, committed suicide by writing a note, Barshi  | "चिऊ मला माफ कर; जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका", मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

"चिऊ मला माफ कर; जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका", मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन

- शहाजी फुरडे-पाटील

बार्शी : पुण्यामध्ये खाजगी कंपनीत काम करणारे बार्शीतील प्रसाद देठे(वय 38) यांनी मराठा आरक्षणासाठी लाईव्ह व्हिडिओ करून व चिठ्ठी लिहून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार आज सकाळी उघडकीस आला असून देठे यांच्या जाण्याने सामाजिक व सर्व क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींकडून हळहळ व्यक्त होत आहे.

तुळजापुर येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीस्थळाचे सेवेकरी म्हणून त्यांनी भरीव कामगिरी केली होती. लिहिलेल्या चिठ्ठीत फक्त मराठा आरक्षण मिळावे याच हेतूने आपण आत्महत्या करत असून माझ्या आत्महत्येला कोणीही जबाबदार नाही असा उल्लेख केला आहे. मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या देठे यांच्या मृत्यूनंतर बार्शीत मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे.

देठे हे नोकरीनिमित्त ते पुण्यातील वाघोली येथे स्थायिक झाले होते. त्यांचे आई वडील हयात नाहीत. एक भाऊ महेश आणि त्यांचे कुटुंब बार्शीतील राहतात. त्यांचा पश्चात एक मुलगा, दोन मुली, पत्नी असा परिवार आहे. काल ओबीसी- मराठा आरक्षणाचा होत असलेला संघर्ष पाहून अत्यंत भावनिक होऊन देठे यांनी मराठा आरक्षणासाठी बलिदान म्हणून आपला जीव दिल्याचे म्हटले जात आहे.

प्रसाद देठे यांनी सुसाईड नोटमध्ये नेमकं काय म्हटलंय?

जयोस्तु मराठा
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळालेच पाहिजे. पंकजाताई, भुजबळ साहेब, हाके, शेंडगे, तायवाडे, टी.पी. मुंडे, गायकवाड आम्हाला आरक्षण मिळू द्या. विनंती आहे तुम्हाला.  हात थरथरतोय म्हणून अक्षर असं आहे. माझ्या मृत्यूला कोणी जबाबदार नाही. मी स्वखुशीने मरत आहे. 
जरांगे साहेब आरक्षण घेतल्याशिवाय मागे हटू नका. विनंती आहे तुम्हाला. माझं तुम्हाला पटणार नाही, पण मी पूर्ण हताश झालोय. चिऊ मला माफ कर. लेकरांची काळजी घे.  धीट रहा. 

मला माफ करा. 
तुमचाच प्रसाद

13 मे फेसबुक कविता पोस्ट पिन करून ठेवली होती

मृत्यू एक सखा

मनाच्या कोपऱ्यात
दडून असतो मृत्यू
काहीच वैर नसतं
तरी भासतो शत्रू

कधीच न पाहीलेला
काळपुरुष दिसतो
शेजारचे दार ठोठावले
तरी मी टरकतो

मीच वैर जपतो
इथे तिथे लपतो
नेहमी झिडकारले
तरी तो जीव लावतो

जगणं जरी छळतं
तरी कुठं कळतं
मन याच्या भयानं
दूर दूर पळतं

देहाचा खुळखुळा
होतो जेव्हा नादहीन
वाट बघत असतो
एक मित्र नवीन

आवाज न करता
येतो मज जवळ
आश्वासक हात
घालतो कवळ

शेवटची फेसबुक पोस्ट 
आत्महत्या करण्यापूर्वी प्रसाद यांनी फेसबुक वर ही पोस्ट शेअर केली आहे. त्यापूर्वी त्यांनी मराठा आरक्षण संदर्भात पाच सहा पोस्ट शेअर केल्या आहेत.

जयोस्तु मराठा 
जरांगे पाटील जिंदाबाद
लाख मेले तरी चालतील लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे , आणी मराठा समाजाचा सध्याचा पोशिंदा फक्त आमचे जरांगे पाटील.  
 एकच मिशन मराठा आरक्षण 


 

Web Title: "Chiu forgive me; Jarange Saheb don't retreat without taking reservation", Marathas ended their lives for reservation, committed suicide by writing a note, Barshi 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.