धक्कादायक; जीवघेण्या सोलापुरी ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट, गांजाचे मिश्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 02:19 PM2020-09-28T14:19:14+5:302020-09-28T14:21:50+5:30

पन्नास ठिकाणी विक्री; अधिकृत केंद्रे बंद असताना रहिवासी परिसरात केला जातोय धंदा

Chloral hydrate, a mixture of cannabis in the deadly Solapuri palm | धक्कादायक; जीवघेण्या सोलापुरी ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट, गांजाचे मिश्रण

धक्कादायक; जीवघेण्या सोलापुरी ताडीमध्ये क्लोरल हायड्रेट, गांजाचे मिश्रण

googlenewsNext
ठळक मुद्देदोनशे ते तीनशे ग्रॅम वजनाचे एक प्लास्टिक पाकीट घरगुती ताडी विक्री करणाºयांच्या हातात सुपूर्द केले जातेक्लोरल हायड्रेट (साधारण १०० ग्रॅम), तुरटी (साधारण १०० ते १५० ग्रॅम ) तसेच पिवळसर गांजा असतो

बाळकृष्ण दोड्डी

सोलापूर : क्लोरल हायड्रेट मिश्रित जीवघेण्या ताडीची विक्री सोलापुरात मोठ्या प्रमाणात सुरू आहे. शहरात पन्नासहून अधिक ठिकाणी घरगुती परिसरात अशी केमिकल मिश्रित ताडीची विक्री जोरात सुरू आहे. यामध्ये गांजाही मिसळला जात असल्याचे माहितगाराने सांगितले. खाकीवर्दीचा आश्रय मिळाल्याने अशा जीवघेण्या ताडीचा काळा धंदा जोरात सुरू आहे. 

क्लोरल हायड्रेट हे एक नशेली पदार्थ आहे. नशा निर्माण करणारी पांढरी पावडर म्हणूनही याची ओळख आहे. यास गुंगीचे औषध म्हटल्यास ते वावगे ठरणार नाही. क्लोरल हायड्रेटचे वारंवार सेवन केल्यास त्याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम जाणवतात. सोलापुरात अधिकृत ताडी विक्री केंद्रे बंद आहेत. नैसर्गिक ताडीची सवय असलेल्यांना आता केमिकल मिश्रित ताडीची गोडी लागली आहे.

पूर्वभागातील तेलुगू भाषिकांमध्ये तडीची नशा करणारे अनेकजण आहेत. याच परिसरात घरगुती ताडी विक्री केंद्रे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. रविवार आणि बुधवारी ताडीला चांगली मागणी असते. १५ ते २५ रुपये असे प्रति बाटलीचे (६५० मिलिलिटर) दर आहेत. आंध्र आणि कर्नाटक परिसरातून क्लोरल हायड्रेट पावडर आणली जात असल्याची माहिती आहे.

क्लोरल हायड्रेट हे केमिकल जीवघेणे आहे. त्याचे वारंवार सेवन केल्यास शरीरातील शारीरिक क्षमता कमकुवत बनते. निद्रानाश उद्­भवतो. चिडचिडपणा वाढतो. नसा ढिल्या पडतात. पिणाºयांची सारखी गोंधळलेली अवस्था असते. सवय झाल्यानंतर नियमित वेळेला ताडी न घेतल्यास उलटी होणे, अचानक चक्कर येऊन पडणे, भूक न लागणे, चिडचिडपणा वाढणे असे अनेक आजार उद्भवतात.

कशी बनते केमिकल ताडी ?

दोनशे ते तीनशे ग्रॅम वजनाचे एक प्लास्टिक पाकीट घरगुती ताडी विक्री करणाºयांच्या हातात सुपूर्द केले जाते. त्याची किंमत जवळपास दोन ते अडीच हजार रुपये इतकी असते. यात क्लोरल हायड्रेट (साधारण १०० ग्रॅम), तुरटी (साधारण १०० ते १५० ग्रॅम ) तसेच पिवळसर गांजा असतो. या नशेली पदार्थांचे मिश्रण केले जाते. एका तांब्यात एक लिटर पाणी टाकून याचे ते मिश्रण बनवतात आणि २४ ते ४८ तास भिजत ठेवतात. त्यानंतर त्या एक लिटर केमिकल मिश्रित पाण्याचे ( अत्यंत कडक आणि कडवट ) ताडीत रूपांतर होते. जवळपास तीस ते चाळीस लिटर पाण्यात प्युअर ताडी टाकून चाळीस बाटल्यांची गाडी बनवली जाते. कडवटपणा कमी करण्यासाठी यात दोन ते तीन किलो साखर मिक्स करतात.

Web Title: Chloral hydrate, a mixture of cannabis in the deadly Solapuri palm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.