स्वच्छ, सुंदर गाव म्हणून पानीवची निवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 04:22 AM2021-02-13T04:22:04+5:302021-02-13T04:22:04+5:30
गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व लोकसहभाग यावर ही योजना आहे. यामध्ये गावाची स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता ...
गावातील नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर व लोकसहभाग यावर ही योजना आहे. यामध्ये गावाची स्वच्छता, व्यवस्थापन, दायित्व, अपारंपरिक ऊर्जा, पर्यावरण, पारदर्शकता व तंत्रज्ञानाचा वापर अशा शंभर गुणांच्या आधारे गावांचे मूल्यांकन केले जाते.
या योजनेच्या तपासणीअंतर्गत शासनाच्या तपासणी पथकाने पानीव गावातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी, आरोग्य उपकेंद्र, व्यायामशाळा, वाचनालय, परिसर स्वच्छता, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन, बंदिस्त गटार, वृक्ष लागवड, वैयक्तिक नळ कनेक्शन आदी बाबींची पाहणी केली होती. त्यामध्ये पानीव गावाची आर. आर. पाटील स्वच्छ व सुंदर गाव पुरस्कार योजनेसाठी माळशिरस तालुक्यातून प्रथम क्रमांकासाठी निवड झाली आहे.
सलग २५ वर्षे महिलाराज असलेली ग्रामपंचायत
१९९७ पासून पानीव ग्रामपंचायतीवर महिला सरपंचाचे अधिपत्य राहिले आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर एखादा अपवाद वगळता २०१२पर्यंत बिनविरोध ग्रामपंचायत म्हणून नावलौकिक मिळवलेल्या पानीव ग्रामपंचायतीच्या पहिल्या महिला सरपंच होण्याचा मान श्रीलेखा पाटील यांच्या नावावर आहे. त्या थेट जनतेतून निवडून येऊन दुसऱ्यांदा या पदावर विराजमान आहेत, तर अलका खवळे, मंगल व्यवहारे, मालन बाबर या महिलांनीही गावचे सरपंचपद भूषविलेले आहे.
कोट :::::::::::::::::::
अंतर्गत रस्ते, बंदिस्त गटारी, पिण्यासाठी आरओ वॉटर, स्वच्छता व टापटीप, सांडपाण्याची व्यवस्था, दिवाबत्ती, जिल्हा परिषद शाळा, अंगणवाड्या, आरोग्य केंद्रे याबाबतीत गाव परिपूर्ण आहे. गावकऱ्यांचेही सहकार्य लाभत आहे. आमचे पुढील लक्ष्य जिल्हा पातळीवर प्रथम क्रमांक मिळविणे हे आहे.
- श्रीलेखा पाटील
सरपंच, पानीव