मुलांच्या आरोग्य तपासणीत आढळले जुनाट आजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 18, 2021 04:16 AM2021-06-18T04:16:04+5:302021-06-18T04:16:04+5:30
अक्कलकोट : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील लहान मुलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली. या तपासणीत दुभंगलेले ओठ, गतिमंद, मतिमंद, ...
अक्कलकोट : राष्ट्रीय बालस्वास्थ कार्यक्रमाअंतर्गत तालुक्यातील लहान मुलांच्या आरोग्य तपासणीला सुरुवात करण्यात आली. या तपासणीत दुभंगलेले ओठ, गतिमंद, मतिमंद, अस्थीव्यंग, कमी वजन असे जुनाट आजार आढळून आले आहेत. मात्र, यातूनही आजारी मुलांवर वेळेवर उपचार होत आहेत.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेने सुरू केलेल्या ‘माझं मूल, माझी जबाबदारी’ या उपक्रमाद्वारे अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण रुग्णालय येथे मुलांची आरोग्य तपासणी सुरू केली आहे. आतापर्यंत चार टप्प्यात तपासणी झाली आहे. विविध आजारांची लक्षणे असणाऱ्या २२० पैकी १८५ मुलांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली. ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अशोक राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रम प्रमुख डॉ. नीरज जाधव यांचे वैद्यकीय पथक परिश्रम घेत आहे.
तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे, बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाढ, विस्तार अधिकारी मृणालिनी शिंदे, पर्यवेक्षिका शुभदा जेऊरकर, अंजली कुलकर्णी, वंदना क्षीरसागर, भाग्यश्री कुलकर्णी, सुषमा नुले, महादेवी चाकोते, विजयालक्ष्मी कोरे, अश्विनी चटमुटगे, सुनंदा कोळी, पुरंत, सविता बिराजदार, अनिता कुलकर्णी, मुनुबाई चव्हाण हे परिश्रम घेत आहेत.
शिबिरासाठी डॉ. सुदीप उटगे, डॉ. सुप्रिया महिंद्रकर, डॉ. शैलजा माळी, डॉ. रेखा लोकापुरे, डॉ. सतीश बिराजदार, विनोद ढगे, श्रीशैल कोटनूर, वैशाली गंभीरे, अमोल पुटगे, शबाना शिकलगार सहकार्य करीत आहेत.
लहान मुलांच्या आरोग्य तपासणी मोहिमेत जन्मजात मोतीबिंदू, बहिरेपणा, हृदयाला छिद्र, मतिमंद, गतिमंद, अस्थीव्यंग, दुभंगलेले ओठ, कमी वजन असे विविध आजारांचे रुग्ण आढळून येत आहेत. अशा मुलांवर विशेष लक्ष केंद्रीत करीत आहोत.
- डॉ. नीरज जाधव.
---
फोटो : १७ अक्कलकोट
अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात लहान मुलांच्या आरोग्याची तपासणी करताना डॉ. अशोक राठोड, डॉ. नीरज जाधव