अक्कलकोट तालुक्यात लसीकरणामध्ये चुंगी प्रथम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 24, 2021 04:21 AM2021-04-24T04:21:45+5:302021-04-24T04:21:45+5:30
अक्कलकोट : शासनाने सुरू केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अक्कलकोट तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात सर्वसामान्यांना लस देण्यात चुंगी ...
अक्कलकोट : शासनाने सुरू केलेल्या कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला अक्कलकोट तालुक्यात चांगला प्रतिसाद मिळत आहे. तालुक्यात सर्वसामान्यांना लस देण्यात चुंगी (ता. अक्कलकोट) ने प्रथम क्रमांक पटकावला आहे. या छोट्याशा एका गावामध्ये ५०० लोकांनी लस घेतली असून, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अश्विन करजखेडे यांनी कौतुक केले आहे.
चुंगी येथे सुरू असलेल्या लसीकरण शिबिराला भेट देऊन आरोग्य अधिकाऱ्यांनी आढावा घेतला. लसीबद्दल जनतेच्या मनात असलेला संभ्रम मोडीत काढत ७०० ग्रामस्थांनी या लसीकरणात सहभाग घेतला. त्यातील पाचशे ग्रामस्थ हे एका चुंगी गावचे आहेत. १ मे पासून शासनाने १८ वर्षांवरील नागरिकांना कोरोनाची लस दिली जाणार असून, त्यापूर्वीच ४५ वयोगटातील चुंगीतील सर्व नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट असल्याची माहिती समुदाय अधिकारी एम. एन. भालकरे यांनी दिली. यावेळी तालुका विस्तार अधिकारी महेश भोरे, परमेश्वर, भाऊसाहेब चंदनशिवे, एम.एम. पाटील, आशा वर्कर सुवर्णा काजळे, शांताबाई पवार, भाग्यश्री वर्दे, गजाबाई पवार, सरपंच सारिका चव्हाण, राजाभाऊ चव्हाण, उपसरपंच महादेवराव माने, ग्रामसेवक मारुती सुरवसे ,बालाजी माने यांनी परिश्रम घेतले.