अकोलेत पारंपरिक गटातच चुरशीची लढत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:17 AM2021-01-10T04:17:05+5:302021-01-10T04:17:05+5:30
अकोले खुर्द ग्रामपंचायतीवर गत पाच वर्षांत विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक दिवंगत बबनबापू पाटील यांची निर्विवाद सत्ता होती; मात्र दीड ...
अकोले खुर्द ग्रामपंचायतीवर गत पाच वर्षांत विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे संचालक दिवंगत बबनबापू पाटील यांची निर्विवाद सत्ता होती; मात्र दीड महिन्यापूर्वी त्यांचे निधन झाले. अकोले खुर्द ग्रामपंचायतीची ११ सदस्य संख्या असून, २९५२ मतदार आहेत. गावाचे संपूर्ण क्षेत्र ओलिताखाली असल्याने सधन गाव म्हणून या गावाची ओळख आहे. या निवडणुकीत विद्यमान सरपंच शकुंतला माळी या प्रभाग दोनमधून दिवंगत बबनराव पाटील ग्रामविकास आघाडीतून निवडणूक लढवीत आहेत. माजी सरपंच विक्रम पाटील हे प्रभाग एकमधून भैरवनाथ ग्रामविकास आघाडीतून रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात दिवंगत बबनराव पाटील यांचे चिरंजीव संभाजी पाटील हे प्रभाग एकमधून निवडणुकीस सामोरे जात आहेत. या निवडणुकीत स्वाभिमानी बहुजन क्रांती पॅनेलने चार उमेदवार उभे केल्याने निवडणुकीत आणखी रंग भरला आहे.