गावकारभाऱ्यासाठी प्रत्येक वॉर्डातील लढती होणार चुरशीनं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2020 04:46 AM2020-12-17T04:46:50+5:302020-12-17T04:46:50+5:30

सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतरच जाहीर होणार असल्याने आपल्या गावचा कारभारी कोण हे मात्र उमेदवाराला प्रत्यक्षपणे लढताना निश्चितपणे समजणार ...

Churshi will fight for the village headman in every ward | गावकारभाऱ्यासाठी प्रत्येक वॉर्डातील लढती होणार चुरशीनं

गावकारभाऱ्यासाठी प्रत्येक वॉर्डातील लढती होणार चुरशीनं

Next

सरपंचपदाचे आरक्षण ग्रामपंचायत निवडणूक झाल्यानंतरच जाहीर होणार असल्याने आपल्या गावचा कारभारी कोण हे मात्र उमेदवाराला प्रत्यक्षपणे लढताना निश्चितपणे समजणार नसल्याने प्रत्येक ग्रामपंचायतीच्या वाॅर्डात आपलीच सरपंचपदाची जागा आली, तर काय करायचे म्हणून सगळेच गावपातळीवर गट-तट व उमेदवार हे ताकदीने निवडणुकीच्या कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे. माढा तालुक्यात मोडनिंब, टेंभुर्णी, उपळाई (बु), उपळाई (खु), दारफळ, मानेगाव, बेंबळे, बारलोणी, चिंचोली, म्हैसगाव, भुताष्टे, अरण, पिंपळनेर, उंदरगाव, केवड अशा अनेक मोठ्या ग्रामपंचायतींच्या चाव्या सध्या आ. बबनराव शिंदे यांच्या गटाकडे आहेत. तर कुर्डू, लऊळ, वाकाव, रोपळे यांसारख्या गावांची सत्ता शिवसेनेच्या गटाकडे आहे. यंदा सरपंचपद हे प्रथमच आरक्षित नसल्याने प्रत्येक वाॅर्डातील उमेदवार आपलेच आरक्षण आले तर काय करायचे म्हणून लक्षवेधीने निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.

तालुक्यातील एकूण १०८ ग्रामपंचायतींच्या सन २०२० ते २०२५ पर्यंतची सरपंचपदाची आरक्षण सोडत अनुसूचित जाती महिला- ७, सर्वसाधारण अनुसूचित जाती- ७, अनुसूचित जमाती- १, नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला- १४, नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण- १५, सर्वसाधारण प्रवर्ग महिला- ३२, सर्वसाधारण प्रवर्ग- ३२ अशा पद्धतीने आहे. पैकी प्रत्यक्षात ८२ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लागलेल्या आहेत.

----

फॉर्म भरण्यापूर्वीच साखर पेरणी

सध्या गावोगावचे विद्यमान गावकारभारी हे आपण गेल्या पाच वर्षात किती विकासकामे केली, हे मतदारांना फॉर्म भरण्याच्या अगोदरपासूनच साखर पेरणी करून पटवून देऊ लागले आहेत, तर त्यांचे विरोधक मात्र सत्ताधारी मंडळींनी प्रत्येक कामात किती घोटाळे केले आहेत, हे मतदारांना सांगू लागले आहेत. काही जण उमेदवारीसाठी आवश्यक कागदपत्रे जमा करण्यात मग्न आहेत. मात्र, सरपंचपद आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर होणार असल्याने वाॅर्डात मात्र चुरसच लागणार आहे.

.....................

Web Title: Churshi will fight for the village headman in every ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.