जिल्हाधिकारी कार्यालयात टॉवरवर चढून शेतकऱ्यांचे सिने स्टाईल आंदोलन
By admin | Published: April 3, 2017 05:15 PM2017-04-03T17:15:17+5:302017-04-03T17:15:17+5:30
.
आॅनलाइन लोकमत सोलापूर
सोलापूर : महावितरण प्रशासनास सांगूनही कोणतेच काम वेळेवर होत नाही़ त्यामुळे शेतातील पिके जळून खाक होत आहेत़ शेतातील ट्रान्सफरम दुरूस्त करून मिळत नसल्याने ते त्वरीत दुरूस्त करून मिळावे या मागणीसाठी शेतकऱ्याने लोकशाही दिनी जिल्हाधिकारी कार्यालयातील टॉवरवर चढून सिने स्टाईल आंदोलन केले़
मोहोळ तालुक्यातील शिरापूर येथे राहणारे शेतकरी अनिल आबाजी पाटील येथील भोपळे आॅडिशनल डीपी यापूर्वी ३१ जानेवारी २०१७ डीपीनं आरसी ५०७ हा दुरूस्त केला होता़ परंतू सदर डीपी दोनच महिन्यात पुन्हा जळाला़ डीपी वरील कनेक्शन मोटारांचे कनेक्शन लूज असल्याकारणाने डीपी पुन्हा जळाला़ सध्या नदीला पाणी आलेले आहे व डीपी जळाल्यामुहे नदीवरील मोटारी बंद आहेत़ त्यामुळे शेतातील पिके पाण्याअभावी जळून जात आहेत़
दरम्यान, डीपीपासून गेलेल्या खांबावर सर्व तारा लूज आहेत़ त्यामुळे वारंवार या परिसरात शार्टसर्किट होत आहे़ या सर्व अडचणीबाबत व तक्रारीबाबत महावितरणच्या कार्यालयाकडे लेखी तक्रार जिल्हाधिकारी, उपअभियंता, अभियंता महावितरण प्रशासन यांच्याकडे देऊनही अद्याप कोणतीच कारवाई झाली नाही़ त्यामुळे सोमवारी लोकशाही दिनात आलेल्या अनिल पाटील या शेतकऱ्यांने जिल्हाधिकारी कार्यालयातील वायरलेसच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला़ मात्र पोलीस व महसुल प्रशासनाच्या आश्वासनानंतर शेतकरी पाटील यास टॉवरवर खाली उतरविण्यात आले़