‘सर्किट बेंच’प्रश्नी आज दिल्लीत बैठक

By admin | Published: December 16, 2014 12:38 AM2014-12-16T00:38:55+5:302014-12-16T00:40:12+5:30

मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, याबाबत उद्या, मंगळवारी केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांच्याबरोबर सायंकाळी पाच वाजता बैठक

'Circuit Bench' question today in Delhi meeting | ‘सर्किट बेंच’प्रश्नी आज दिल्लीत बैठक

‘सर्किट बेंच’प्रश्नी आज दिल्लीत बैठक

Next

कोल्हापूर : मुंबई उच्च न्यायालयाचे ‘सर्किट बेंच’ कोल्हापुरात स्थापन व्हावे, याबाबत उद्या, मंगळवारी केंद्रीय कायदामंत्री सदानंद गौडा यांच्याबरोबर दिल्ली येथे सायंकाळी पाच वाजता बैठक होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
खासदार धनंजय महाडिक यांच्या पुढाकाराने ही बैठक होत असून रविवारी सायंकाळी कोल्हापुरातून खंडपीठ कृती समितीचे निमंत्रक अ‍ॅड. विवेक घाटगे यांच्यासह सहा वकील रवाना झाले. या बैठकीत मंत्री गौडा कोणते आश्वासन देतात, याकडे कोल्हापूर, सांगली, सातारा, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या सहा जिल्ह्यांतील वकील व पक्षकारांचे लक्ष वेधले आहे.
गतवर्षी या मागणीसाठी वकिलांनी ५५ दिवस आंदोलन करून तत्कालीन काँग्रेस आघाडीला जागे केले. त्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रथम सर्किट बेंचची मागणी करा, असे सांगून याला मान्यता दिली. यावेळी उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मोहित शहा यांनी न्यायाधीश वझीफदार यांच्या नेतृत्वाखाली त्रिसदस्यीय समिती नेमली. ३१ जानेवारी २०१४ अखेर यावर निर्णय घेऊ, असे आश्वासन शहा यांनी सहा जिल्ह्यांतील वकिलांना दिले. पण, ११ महिने उलटून गेले तरी यावर निर्णय झालेला नाही. समितीने शहा यांना अहवाल दिला असल्याचे समजते. पण, अद्याप खंडपीठाबाबत निर्णय झालेला नाही. सध्या उच्च न्यायालयात सुमारे ७५ हजार खटले प्रलंबित आहेत.
दरम्यान, गेल्या दोन दिवसांत कोल्हापुरात या मागणीसाठी वकिलांनी तीव्र आंदोलन केले आहे. त्यामुळे दिल्लीतील बैठक निर्णायक ठरण्याची शक्यता बळावली आहे. दिल्लीतील या बैठकीसाठी बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. विवेक घाटगे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. अजित मोहिते, अ‍ॅड. सचिव राजेंद्र मंडलिक, अ‍ॅड. प्रशांत चिटणीस, अ‍ॅड. बाळासाहेब पाटील, अ‍ॅड. राजेंद्र किंकर, आदी उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: 'Circuit Bench' question today in Delhi meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.