पंचायत समितीत नागरिकांना प्रवेश बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:19 AM2021-04-03T04:19:10+5:302021-04-03T04:19:10+5:30
१ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातील ६९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली. ...
१ एप्रिल रोजी पंचायत समिती कार्यालयातील ६९ अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोविड टेस्ट घेण्यात आली. त्यापैकी दोघांची टेस्ट पॉझिटिव्ह आढळून आली. त्या अनुषंगाने यापुढे दररोज पंचायत समिती कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर कोविड चाचणी केली जाणार आहे.
तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थांनी अत्यावश्यक कामाशिवाय पंचायत समिती कार्यालयात येऊ नये. आपले अर्ज, निवेदने bdosangola41@gmail.com या ई-मेलवर ऑनलाईन पाठवून द्यावेत, असे आवाहन सभापती राणी कोळवले, गटविकास अधिकारी संतोष राऊत यांनी केले आहे.
काेट ::::::::::::::::
पंचायत समिती कार्यालय प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे. कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियमित कोविड टेस्ट केली जाईल अभ्यागतांनासुद्धाकोविड टेस्ट केल्याशिवाय कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही. सर्वांनी याबाबत प्रशासनास सहकार्य करावे.
- संतोष राऊत
गट विकास अधिकारी, सांगोला.